मित्रांनो!, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विक्रम बत्रा हे कारगिल युद्धावेळी नायक होते. विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धावेळी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.एक धाडसी सैनिक म्हणून बत्रा यांची ओळख आहे. त्यांच्या जिवनात अनेक थरारक किस्से घडले होते. शेरशाह या चित्रपटात त्यांच्या जिवनातील अनेक किस्से दाखवण्यात आले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. करण जोहर हा या चित्रपटाचा निर्माता आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा याने साकारलेल्या विक्रम बत्रा यांच्या भूमिकेचं प्रत्येकजण कौतुक करत आहे. ही भूमिका करण्यासाठी सिध्दार्थने तब्बल 7 कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे. या चित्रपटातील मानधनामध्ये त्याने कियारा अडवणीला देखील मागे टाकलं आहे. कियाराने या चित्रपटात विक्रम बत्रा यांची मंगेतर म्हणजेच डिंपलची भूमिका केली आहे. या भूमिकेसाठी तिने 4 कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे.

तसेच इतरही काही दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अभिनेता शिव पंडित याने देखील शेरशाह चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्याने या चित्रपटात लेफ्टनंट संजीव जिमी जामवालची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने 45 लाख रुपये मानधन घेतले आहे. तसेच निकीत धीरने चित्रपटात अजय सिंगची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने 35 लाख रुपये मानधन घेतले आहे. तर विक्रम बत्रा यांचे जवळचे मित्र असणारे सुभेदार बन्सी लाल यांची भूमिका साकारणाऱ्या अनिल चरणजीत यांनी 25 लाख रुपये मानधन घेतलं आहे.

दरम्यान, भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित असणाऱ्या शेरशाह चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात शिव पंडित, हिमांशू मल्होत्रा, निकितिन धीर आणि साहिल वैद यांच्याही भूमिका आहेत.

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani ) स्टारर ‘शेरशाह’ (Shershaah) काल अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला. चित्रपट ऑनलाइन रिलीज झाल्याच्या काही तासांतच, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे नेटिझन्सकडून तर सोशल अकाऊंटवरून चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे, आजच्या घडीला जणू सर्वत्र चित्रपटाचेच वर्चस्व आहे.