मित्रांनो!, आपल्या लाडकी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मधील एक तुफान लोकप्रिय आणि ग्लॅमरस पात्र बबिताजी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही महिन्यांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिसली नव्हती, त्यानंतर या अभिनेत्रीने शो सोडलाय असेही वृत्त होते. त्यानंतर एक बातमी अशी ही आली होती की निर्माता असित मोदी यांनी म्हटले आहे की मुनमुन दत्ता यांनी सोशल मीडियावर वापरलेल्या जातीवादी शब्दासाठी पुन्हा माफी मागावी लागेल कारण त्यांनी ट्विटरवर दिलेली माफी पुरेशी नव्हती.

झाले असे होते की युट्यूब वर एका व्हिडिओ मध्ये जातीवाचक शब्द प्रकरणात तुरुंगातून सुटल्यापासून तारक मेहताच्या बबिताजी शूटिंगमधून बरेच दिवस गायबच होत्या. या संदर्भात मालिकेच्या चाहत्यांच्या मनांत हा प्रश्नं पडला होता की, खरंच का ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून बबिताची झालीय एक्झिट? कारण दीर्घ काळापासून ती शूटिंगमधून गायब होती. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ‍♀️ (@mmoonstar)

या मालिकेतील जेठालाल, तारक, दयाबेन, भिडे, बबिताजी अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत बबिताची भूमिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मुनमुन दत्ताने. या भूमिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, मुनमुन दत्ताने मालिका सोडल्याची चर्चाच सर्वत्र ऐकायला मिळत होती.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. तसेच शूटिंगलाही बंदी होती. त्यामुळे बऱ्याच मालिकांनी आपले बस्तान इतर राज्यात हलविले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे शूटिंग दमणमध्ये हलविण्यात आले होते. आता लॉकडाउन उठवल्यानंतर पुन्हा मुंबईत शूटिंगला सुरूवात झाली आहे. मागील एक महिन्यापासून मुंबईत शूट सुरू आहे पण या कार्यक्रमाच्या शूटिंगमधून मुनमुन गायब होती.

ती एकदा सुद्धा सेटवर आलेली नव्हती. यातही विशेष म्हणजे तिची गैरहजेरी लक्षात घेऊन कथानकही लिहिले जात होते. अशा परिस्थितीत मुनमुनने शो सोडला असल्याचा तर्क लावला जाणे स्वाभाविकच आहे. मात्र मुनमुनने मात्र कधीच मालिका सोडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नव्हता.

यूट्यूब व्हिडिओमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्यामुळे मुनमुन वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वादामुळे तिला तुरूंगातही जावे लागले होते. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर कोर्टाने तिच्याविरोधात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आणि तिला थोडा दिलासा मिळाला होता. आता असे दिसते की मुनमुन दत्ता आणि निर्मात्यांमधील मतभेद संपले आहेत. मुनमुन आता पुन्हा शूटवर आली आहे.

मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये परत आली आहे आणि तिने शूटिंगला सुरूवात केली आहे. मुनमुन दत्ता शोमध्ये बबिता जी ची भूमिका साकारत आहे. असे सांगितले जात आहे की निर्माते या आठवड्यात तिच्या कमबॅकच्या हटके आणि अनोख्या भागाचे प्रसारण करतील. जेव्हा मुनमुन दत्ता अलीकडेच सेटवर दाखल झाली, तेव्हा संपूर्ण टीम तिला पाहून आश्चर्यचकित झाली.

मुनमुन दत्ता आणि निर्माता असित मोदी यांनी फोनवर बोलून आणि गोष्टी विसरून आणि पुढे जाण्याविषयी बोलून प्रकरण मिटवले. असे सांगितले जात आहे की जेव्हापासून मुनमुन सेटवर परतली आहे, तेव्हापासून तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आता ती सेटवर प्रत्येकाशी प्रेमाने बोलते, तिचे बदललेले वर्तन पाहून इतर कलाकारांना याचे आश्चर्य वाटते आहे.