मालिकेच्या सेटवर एखाद्या अभिनेत्री ने जर नखरे केले आणि सगळ्या टीम ने ठरवलं की तिला आता काढून टाकायचं तर अश्या अनेक गोष्टी मनोरंजक इतिहासात घडलेल्या आहेत.
सध्या एका मालिकेच्या सेटवर प्रसिध्द अभिनेत्रीच्या वागणुक चुकीच्या पध्दतीची असल्याने तिला काढून टाकण्यात आलं आहे.
मालिकेचं नाव आहे, आई माझी काळू बाळू. अभिनेत्रीचं नाव आहे, प्राजक्ता गायकवाड. होय, जिला आपण शिवरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या मालिकेत पाहिलं असेल.
त्यावर एका प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री ने एका मुलाखतीत तिच्यावर खूप आरोप केलेले आहेत. चला तर मग प्रकरण नेमकं काय आहे ? हे सविस्तर जाणून घेऊयात.
आई माझी काळुबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आलं. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. प्राजक्ताला तडकाफडकी काढून टाकण्यामागचं कारण मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितलं.
अलका कुबल म्हणाल्या की सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे सुरू असायचे. मध्येच डोकं दुखतं म्हणायची, मध्येच शूटिंग थांबवायला सांगायची, मध्येच रडत बसायची.
शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण मी तिला समजून घेतलं”, असं त्यांनी सांगितलं.
प्राजक्ता दोन, चार तर कधी कधी सहा तास रुममधून बाहेर येत नसल्याची तक्रार अलका यांनी केली.
सगळे तिची वाट पाहत बसायचे. आशालता यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार तिच्यासाठी थांबायचे. तिला कसलीच लाज नाही”, अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला.
सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे हे तिचं सुरूच असायचं. शूट सुरू झाल्यावर पण तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाइलाजाने रात्री शूट करावं लागायचं.
या कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येते, कोणाच्या जिवावर माज करतात”, अशा शब्दांत त्या भडकल्या.
प्राजक्ताला समज देऊन दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. मात्र तरीही तिच्या वागणुकीत काही बदल न झाल्याने तिला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं.
अलका कुबल या प्राजक्ता गायकवाड वर प्रचंड चिडलेल्या आणि भडकलेल्या आहेत.