Pindadaan Marathi Movie Review

प्रेमकथेच्या माध्यमातून पटवून देणारं ‘पिंडदान’

चित्रपटाच्या नावातच वेगळेपण असलं की चित्रपटाविषयी उत्सुकता वाढते.  असंच काहीसं घडलं आहे प्रशांत पाटील दिग्दर्शित ‘पिंडदान’ या चित्रपटाच्या बाबतीत.  चित्रपटाचं नाव ‘पिंडदान’ असं असल्यामुळे नक्की चित्रपटाचा आशय काय असेल याविषयी सर्वांमध्ये जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली असावी.

‘पिंडदान’ ही प्रेमकथा आहे. पण ही प्रेम कथा मनवा नाईक आणि सिध्दार्थ चांदेकरची की सिध्दार्थ चांदेकर आणि पॉला मॅकग्लिनची की हा लव्ह ट्रँगल असावा?

Pindadaan 2016 Marathi Movie Songs Free Download

लंडनमधील एका वृत्तवाहिनी चॅनेलची संपादक रुही (मनवा नाईक) आणि डॉक्युमेंटरी बनवणारा आशुतोष (सिध्दार्थ चांदेकर) पिंडदान या गोष्टीवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी भारतात येतात. भारतात आल्यावर डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने आशुतोष त्याच्या आजीचं पिंडदान करण्यासाठी तयार होतो. रुही आणि  आशुतोषमध्ये प्रेमकथा फुलते मात्र फक्त मनवाच्या बाजूने. सिध्दार्थ मनवाला फक्त एक मैत्रिण मानत असतो. यादरम्यान आशुतोष आणि अॅनाची (पॉला मॅकग्लिन) भेट होते.  हळूहळू आशुतोषला अॅनाची ओढ लागते, तिच्याविषयी प्रेम होतं जे रुहीला अजिबात मान्य नसतं. पुण्यातील ज्या महालात रुही आणि आशुतोष राहत असतात त्याच्या दुस-या मजल्यावर अॅना राहत असते. पण महालातील व्यक्तींच्या सांगण्यावरुन ती जागा तर कित्येक वर्ष अडगळीची खोली म्हणून वापरली जाते. नक्की या प्रेमकथेचं गूढ काय आहे? भास आणि आभास यांच्यामधील हा खेळ चालू असावा का? या संपूर्ण गोष्टीचं उत्तर म्हणजे ‘पिंडदान’.

Pindadaan 2016 Marathi Movie Songs Free Download

‘पिंडदान’ ही प्रेमकथा असेल यावर कधी विश्वास बसला नाही, पण प्रशांत पाटील यांनी या चित्रपटातून प्रेमकथेला मर्यादा नसते आणि ‘पिंडदान’ किती महत्त्वाचे हे दाखवून दिले. या चित्रपटातील लोकेशन्स पाहण्याजोगे आहेत. चित्रपटाच्या छायांकानी चित्रपटातील लोकेशन, कलाकार आदी गोष्टी योग्य टिपल्या आहेत. चित्रपटांतील गाण्यांनी प्रेमकथा अजून फुलली आहे.  मध्यांतर पूर्वीचा चित्रपटाचा भाग पूर्णपणे प्रेमकथेवर आधारित असल्यामुळे तिथे चित्रपट रेंगाळतो. मात्र शेवटच्या २०-३० मिनिटांमध्ये चित्रपट पूर्णपणे वेगळं वळण घेतो. चित्रपटाच्या शेवटचा भागातील गूढ सुरुवातीपासून काही प्रमाणात दाखवला असता तर उत्सुकता अजून ताणली गेली असती.

पिंडदान केल्याने माणसाला मुक्ती मिळते हा विचार आणि पिंडदान करण्यासाठी पण आजकाल पैसे घेतले जातात ही सद्यपरिस्थिती या चित्रपटात मांडली आहे. सर्वांनाच रुचेल आणि पटेल असा हा चित्रपट आहे. एका वेगळ्या पठडीतला चित्रपट अनुभवयाला काहीच हरकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here