मित्रांनो! मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हे नांव घेतांच आपल्या डोळ्यांसमोर येते जत्रा चित्रपटातील “कोंबडी पळाली…तंगडी धरून” हे तुफान लोकप्रिय गाणे. क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची नेहमीच फेवरेट राहिलेली आहे. अलीकडे तिने चित्रपट माध्यमात काम करणे फारच कमी केलेले आहे.
तरीही ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेत असते. क्रांतीचे पती एनसीबीचे अधिकारी (NCB Officer) समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे आहेत. सध्या समीर हे सर्वत्र गाजत असलेल्या बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्र’ प्र’करणामुळे चर्चेत आहेत.
समीरच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टिमने मुंबईतील क्रूझवरील ड्र’ग्ज पार्टीचा प’र्दा’फाश केला आहे. याच अनुषंगाने क्रांती रेडकरने नुकत्याच इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पती समीर यांच्या कामगिरीबद्दल तिला रास्त अभिमान वाटतो असे सांगितले आहे.
या मुलाखतीमध्ये समीर यांच्या हायप्रोफाइल ड्र’ग रेडबाबत सांगतांना क्रांती म्हणाली की, ‘समीर हा मेहनती आहे. आज, तो बॉलिवूडशी संबंधित ड्र’ग्स प्र’करणे हाता’ळत आहे. म्हणूनच तो हायलाइट होत आहेत. जेव्हा तो चौ’कशी करत असतो किंवा ऑ’प’रेशनवर काम करत असतो, तेव्हा मी त्याला स्पेस देते मी त्यांला कोणताही प्रश्न विचारत नाही कारण मी त्याच्या कामाचा खूप आदर करते.’
ती पुढे असेही म्हणाली की, ‘तो अनेक वेळा ऐवढा व्यस्त असतो की त्याला झोपायला देखील वेळ मिळत नाही. तो फक्त दोनच तास झोपतो. जेव्हा तो एखाद्या विशिष्ट प्रकरणाबद्दल फोनवर बोलत असतो तेव्हा मी कधीही त्याचे लक्ष विचलीत होईल असे काही बोलत नाही. तो दररोज गु’प्त ऑ’प’रेशन्ससाठी काम करतो आणि त्याला त्याच्या कुटुंबासमोर या ऑ’प’रे’शन्स संबंधित काहीही उघड करण्याची परवानगी नाही.
मी त्याच्या समोर कोणत्याच गोष्टीची तक्रार करत नाही. समीर अशा क्षेत्रात आहे जिथे एक मिनिटही काम न करता बसता येत नाही. मला त्याच्या कामाचा आणि त्याचा अभिमान आहे.’ समीर यांच्या मुलाखतींबाबत क्रांती म्हणाली, ‘मी खूप खुष आहे की समीरने मीडियाला मुलाखती देण्यास सुरूवात केली आहे. तो कसलीही माहिती कधीच कोणाला देत नाही. मला त्याचा खूप आदर आणि अभिमान वाटतो.’