सध्या मराठी मालिकेत एक मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. जिचं नाव आहे ‘ सुंदरा मनामध्ये भरली ”,. कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी ही मालिका प्रदर्शित झालेली आहे.
त्या मालिकेचा इतरांच्या तुलनेत खूप वेगळी कथा आहे, म्हणून ती प्रेक्षकांना फार आवडत आहे. त्यातील पात्र एकेमकांच्या विरोधात असून सुद्धा किती निखळ आहेत म्हणूनही मालिका प्रेक्षकांना फार आवडत असेल. त्यातील हिरो हा फिटनेस किंग असतो तर हिरोईन ही जाडी असते. त्यामुळे त्यांच्यातली जुगलबंधी सध्या फार चर्चेत आहे. त्या हिरोचं नाव आहे समीर परांजपे.
तर मुलीची भूमिका करत आहे, अक्षया नाईक. या मालिकेत काम करणाऱ्या इतर सर्व कलाकरांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. त्यात मालिकेचा टीआरपी ही खूप जास्त आहे. त्यात काम करणारे हिरो हिरोईन यांच्याबद्दल माहिती जाणुन घेण्यासाठी आज प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे. तर आज आपण अभिनेता समीर परांजपे याच्याविषयी जाणुन घेणार आहोत..
समीरच्या मालिकेतील भूमिकेची सगळीकडेच चर्चा आहे. हरहुन्नरी कलाकार समीर परांजपे चा जन्म ८ नोव्हेंबर १९९० रोजी मुंबईत झाला होता. त्याला लहानपणापासुनच अभिनयाची आवड होती. पुढे त्याने त्यातच करीयर करायचं ठरवलं. कॉलेज मध्ये असताना त्याने एकदा फिरोदिया करंडक केलां. तिथून पुढे अभिनयाची गाडी त्याची सुरु झाली. त्याने पदवीचं शिक्षण पुर्ण झाल्यावर कायमचं अभिनय क्षेत्र निवडलं.
समीर फक्त चांगला अभिनेताच नाहीतर एक उत्कृष्ट सेमी क्लासिकल सिंगर आहे. त्याने गाण्याची आवड ही खूप जपलेली आहे. सोशल मिडीयावर याआधी त्याने गाण्याची झलक खूप वेळा दाखवलेली आहे.
भातकुली हा त्याचा पाहिला मराठी चित्रपट. अजिंक्य देव यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटामध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली.
त्याची सुंदरा ही मालिका पहिलीच नाही. त्याने याआधी खूप मालिकेत चांगलं काम केलेलं आहे. त्यावेळी ही खूप लोकप्रिय झाला होता. सोनी मराठी मधून गर्जा महाराष्ट्र आणि स्टार प्रवाह मधील अग्निहोत्र मध्ये चांगली भूमिका साकारली आहे.
२७ नोव्हेंबर २०१६ साली त्याने त्याची मैत्रीण अनुजा सोबत लग्न केलेलं आहे. अनुजा आधी पिंपरी मध्ये आयटी क्षेत्रात काम करत होती. आता ती पुण्यात जॉब करत आहे. ते दोघे सध्या सुखी आयुष्य जगत आहेत. सध्या दोघे पिंपरी मध्ये राहतात. पण लवकरच मुंबईला राहायला जाणार आहे. कारण कामानिमित राहणं सोपं होईल.
समीर मराठीतच नव्हे तर शाहरुख खान ची निर्मिती असलेली क्लास ऑफ ८३ फिल्म मध्ये ही दिसला होता. सध्या त्याने फिटनेस आणि अभिनय यांच्यावर चांगलाच फोकस केलेला आहे. समीरला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..