उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अन्नपाण्याइतकीच पुरेशी झोपदेखील महत्वाची आहे. ह्यामुळे काही विशिष्ट आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो, मेंदू निरोगी राहतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

दररोज 6-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याच लोकांना शांत झोपेसाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. झोपण्याआधी ह्या पदार्थांचे सेवन तुम्हाला उत्तम झोप देण्यास मदत करतील.

बदाम मेलाटोनिन आणि झोपे वाढविणारे खनिज मॅग्नेशियमचे स्त्रोत आहेत, झोपण्यापूर्वी बदाम खाल्ल्यास चांगल्या झोपेसाठी फायदा होतो.

किवी सेरोटोनिन आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात, झोपेच्या आधी किवी खाल्ल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

फॅटी फिश व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा एक चांगला स्रोत आहे, ह्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे चांगली झोप येण्यास मदत करतात.

अक्रोड मेलाटोनिन आणि हेल्थी फॅटचा एक चांगला स्त्रोत आहेत. हे कदाचित झोप चांगली येण्यासाठी मदत करतात.

पांढर्या तांदळात जास्त प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स (जीआय) असल्यामुळे झोपेआधी भात खाणे फायदेशीर ठरू शकते. उच्च जीआय चांगले झोपेस मदत करते.

ह्यासोबतच इतर खाद्यपदार्थ आणि पेये, ह्यांचा झोपेवर होणाऱ्या त्यांच्या प्रभावांबद्दल असलेली माहिती मर्यादित असली तरी काही पदार्थ जसे की डेअरी उत्पादने, केळी आणि ओटमीलमध्ये झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ओळखले जाणारे पोषक घटक असतात असे मानले जाते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.