सध्या झी मराठी वर सध्या नव्याने सुरु झालेली एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे. मालिकेचे कथानक प्रेमाची रिलेटेड आहे. तसेच यामध्ये प्रमुख भूमिकेत दोन दिग्गज कलाकरांची जोडी आहे. त्या कलाकारांचे नाव आहे, श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरे. दोघांच्या अभिनयाने या मालिकेची रंगत आता चांगलीच वाढत आहे. अनेकांना उत्सुकता लागलेली आहे की प्रत्येक एपिसोड दिवसेंदिवस या मलिकेचा कसा असेल ते.

बरं फक्त श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरेच नाही तर एक छोटीशी अशी गोंडस मुलगी आहे की जिने सर्वांची मने जिंकलेली आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून गेलेली आहे. जेव्हा या नव्या सिरीयल चे प्रोमो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते तेव्हापासून छोटीशी मुलगी खूप चर्चेत आहे. फक्त मोठ्या लोकांच्याच नाहीतर बाल प्रेक्षकांना ही मालिका पाहायला तिने भाग पाडलेलं आहे.

ज्या मालिकेबद्दल आपण सध्या बोलत आहोत त्या मालिकेचे नाव आहे, माझी तुझी रेशीम गाठ. जी प्रेमाच्या गाठीवर आधारित आहे. आणि ज्या बाल कलाकाराचे आपण बोलत आहोत जिने प्रार्थना सोबत अभिनय केलें आहे जे आपल्याला प्रोमो मध्ये दिसून येत आहे, तिचे नाव आहे मारा वायकूळ. मारा वायकूळ या चिमुकल्या परीने खूप निरागस असा अभिनय केला आहे. तिच्या सर्वांग सुंदर दिसणे व निरागसतेचा अभिनय चाहत्यांना खूप भावत आहे.

त्याच सोबत श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरे यांचा अभिनयाची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. इतर ही अनेक कलाकार यांत काम करत आहेत. यातील सर्वच अभिनेते अभिनेत्री हे सोशल मिडीयावर फार कार्यरत असतात.

प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे हे आभाळमाया नंतर अनेक वर्षांनी मराठी मालिकांत पदार्पण करत आहेत. तर प्रार्थना बेहरे सुद्धा खूप वर्षांनी मालिका करत आहेत. पण प्रेक्षकांना या दोघांची लव्हस्टोरी पाहायला खूप आवडत असल्याचं दिसून येत आहे. कारण मालिकेचे प्रोमो प्रचंड व्हायरल व शेयर झालेले आहे.

श्रेयस तळपदे या अभिनेत्याच्या सोशल मिडीयावर म्हणजे इन्स्टा फेसबुकवर कौटुंबिक फोटो आपल्याला दिसून येतील. कारण श्रेयस आपल्या फ्यामिली शी खूप ऋणानुबंध जोडलेला आहे. म्हणजे रेशीमगाठचं म्हणावं लागेल. तसेच प्रार्थना चे ही आहे.

तीही सोशल मिडीयावर नवऱ्या सोबत आणि इतर सदस्यासोबत फोटो शेयर करत असते. यामध्ये माया वायकूळ मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एवढीशी सोनपरी. तर या सर्वांना मालिकेच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.