सध्या स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील एक मालिका फार चर्चेत आहे. ज्यामधील कथानक आणि त्यातील कलाकार हे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. कारण मालिका ही प्रेक्षकांना आवडण्याचे कारण म्हणजे गोष्ट ही आपल्या घरातली वाटत आहे, आसपासची वाटते आहे हेच आहे. प्रत्येक एपिसोड मध्ये मालिकेच्या काही न काही अनपेक्षित घडत आहे.

गौरी आणि जयदीप यांची भूमिका खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यांची जोडीचे लाखो चाहते आहेत. आज ही जोडी आणि मालिका घराघरात जाऊन पोहोचलेली आहे.

गौरी आणि जयदीप यांचे सेटवर शुटींग व्यतिरिक्त केलेली काही रील्स किंवा छोटी मोठी व्हिडिओ नेहमी सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. इन्स्टा वर सुद्धा दोघे खूप कार्यरत आहेत. गौरी आणि जयदीप ची जोडी ज्या मालिकेत काम करतात त्या मालिकेचे नाव आहे सुख म्हणजे नक्की काय असतं.

आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की सुख म्हणजे नक्की काय असत मधील जयदीप ची भूमिका कोण करते ? गौरी ची सुद्धा कोण करते ? यांची खऱ्या आयुष्यातील नवे काय ? अभिनेता मंदार जाधव हा करत आहे.

मंदार जाधव हा एक उत्कृष्ट असा अभिनेता आहे. त्याचा सोशल मिडीयावर चांगलाच चाहता वर्ग आहे. मंदार हा खूप फिट आणि हिट अभिनेता आहे.

सर्वांच्या पसंतीस खरी उतरणाऱ्या गौरीची भूमिका साकारत आहे अभिनेत्री गिरीजा प्रभू. गिरीजा प्रभू ही खूप उत्तम कामे करणारी अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिकांत कामे केली आहेत. या मालिकेमुळे ती खूप चर्चेत आलेली आहे. गिरीजा प्रभू चा मालिकेत असलेला इनोसंट हा खूप टीआरपी साठी फलदायी ठरत आहे.

गौरी आणि जयदीप म्हणजेच मंदार आणि गिरीजा हे सोशल मिडीयावर लाइव्ह आले होते. चाहत्यांच्या सोबत सवांद साधत होते. ज्यामध्ये चाहत्यांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले. या दोघांनी सुद्धा खूप उत्सुकतेने उत्तरे दिली.

एका युजरने विचारलं की तुमच्या दोघांन मध्ये कोण जास्त विनोदी आहे ? गौरी की जयदीप ? तर मंदार म्हणाला की गौरी म्हणजेच गिरीजा ही खूप हटके अशी विनोदी अभिनेत्री आहे. एकाने विचारल की तुम्हाला काय आवडते व काय नाही आवडत नाही ? तर दोघांनी वेगवेगळी उत्तरे दिली गौरी म्हणाली बऱ्याच गोष्टी आवडतात.

पण काही आवडत नाही असेही सांगितलेले आहे. तर ज्यामध्ये चायनीज एक आहे. दुसरीकडे काही प्रेक्षकांनी त्यांना विचारलं की तुमचं मालिकेत नातं चांगलं राहुद्द्या इतर मालिकेत होतं तसं करू नका तर यावर दोघेही बोलले. म्हणाले की आम्ही असेच राहणार आहोत; पण मालिकेत रंजकता येतच राहणार एवढं नक्की.

लाईव्ह येऊन त्यांनी मनभरून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. अश्याने त्यांचा चाहता वर्ग अजून वाढत आहे. मालिकेतील सर्वांना व गौरी जयदीप या जोडीला पुढील भावी वाटचाली साठी शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.