सध्याची परिस्थिती पाहता आता सगळ्याच क्षेत्रातील लोकं एकत्र येऊन ज्या त्या परीने मदत करायला लागले आहेत. कारण त्याशिवाय काहीच पर्याय ही नाही. जर हा अस्वस्थ असा काळ लवकर गेला तर कुठे माणूस पुन्हा पहिल्या सारखं जगू शकतो.

पण हा काळ ही जाईना आणि काहीच स्थिर होईना. त्यामुळे सगळेच आता एकत्र आले आहेत. मग त्यात कला क्षेत्रातील ही अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत की ज्यांनी आपापल्या परीने शक्य ती मदत करायला सुरुवात केलेली आहे.

काही सोशल मीडियावर कार्यरत राहून स्टोरी, लाईव्ह येऊन प्रेक्षकांना, चाहत्यांना ज्याला कुणाला गरज आले त्याला त्यांच्या संपर्कातून आग्रह करत आहेत. आणि काही आर्थिक मदत ही करत आहेत.

अश्यात मराठी मधील एक अभिनेत्री अशी आहे की जिने एका वेगळ्याच पध्दतीने मदत कार्य सुरू केलं आहे. जे पाहून आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. चला मग सविस्तर जाणून घेऊयात की नेमकं कोण ती अभिनेत्री आणि कशी ती मदत करत आहे.

गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमार्फत म’हा’मा’री’ला सामोरे जात असताना उपाययोजना आणि मदत जाहीर केलेल्या पाहायला मिळतात. अगदी मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनीही यात खारीचा वाटा म्हणून आपल्या कडून होईल ती मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. यात आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची सोय करण्याचे जाहीर केले आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात… सामाजिक भान जपणारी ही मराठी अभिनेत्री आहे “अश्विनी प्रदीपकुमार महांगडे”.

समाजिक भान असणारे खूप तुरळक असतात. त्या आता या अभिनेत्री चा समावेश झाला आहे. जे समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पाऊल आहे.

जिला अनेकजण मालिकेतील कामामुळे ओळखतात. तिचे इंस्टा फेसबुक आणि ट्विटर वर अनेक चाहते आहेत. जे तिला सतत फोल्लो करत असतात.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपतींची कन्या राणूआक्का बनून त्यांनी आपल्या अभिनयातुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर या मालिकेपूर्वी झी मराठीच्या अस्मिता या मालिकेतून अश्विनीने मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते आता स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघाची भूमिका त्या साकारत आहेत. अश्विनी महांगडे यांनी दोन वर्षांपूर्वी “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान “ची स्थापना केली आहे या प्रतिष्ठानमार्फत त्यांनी आजवर अनेक गरजूंना मदत केली आहे.

याशिवाय सुरुवातीला ‘महावारी’ या वेबसिरीजमधून महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुरंदर येथील रयत बुक बँक असो वा रक्तदान शिबिर अशा सामाजिक कार्यात त्या नेहमीच हिरीरीने सहभागी होतात. नुकतेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत त्यांनी रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसाठी विनामूल्य जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणताना दिसत आहेत.

समाज सेवेतून ही आपण योग्य ती मदत करू शकतो हे या अभिनेत्री ने दाखवून दिलं आहे. नि इतर कलावंताला एक जाणीव करून दिली आहे की मदत फक्त सोशल मीडियावर कार्यरत राहूनच नाही करता येत तर अशी ही करता येते.

विशेष म्हणजे फक्त एकाच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हा उपक्रम केला आहे. फलटण, सातारा, शिरवळ, खंडाळा, सासवड, बारामती, टिटवाळा शहर, ठाणे शहर, कल्याण शहर, अष्टा शहर, हिंडलगा बेळगाव, इस्लामपूर, नेरुळ, अंधेरी, घाटकोपर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी ही मोफत जेवणाची योजना आखल्याचे सांगितले आहे यासंदर्भात अधिक माहिती तुम्हाला त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन पाहता येईल.

रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. “या म’हा’सं’क’टा’त बाहेर सर्वच गोष्टीची टं’चा’ई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे.

आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा. ” असे म्हणून त्यांनी इतरांनाही मदतीचे आवाहन करण्यास सांगितले आहे.

तिच्या सारखं अनेक अभिनेते अभिनेत्री यांनी जर वेगवेगळ्या माध्यमातून अशी समाजपयोगी कामे केली तर आपण लवकर बरे होऊ शकतो. तर खूप मदत होईल आणि या कोरोना काळापासून आपण लवकर वाचू शकतो. त्या अभिनेत्री च्या या कामाला मनापासून सलाम आणि पुढील भावी यशस्वी आणि अश्याच कामाच्या वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.