मराठी सिनेसृष्टीतील नखशिखांत सौंदर्याची, अप्रतिम अभिनय सादर करणारी जुनी अभिनेत्री वर्षा उसगांवकर. 90 च्या दशकांत या अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना घायाळ केले. तिच्या अभिनयाची अदाकारी ही तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. मात्र ही अभिनेत्री आता कुठे आहे, ती काय करते. अशी अनेक माहिती तिच्या बद्धल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो.
मराठी चित्रपटांसह हिंदी व राजस्थानी चित्रपटांत सुद्धा आपल्या अफलातुन अभिनयाने रसिकांना मोहित करणारी अशी ही आपली मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर. आपल्या लहान वयापासूनच तिने अभिनयाला सुरुवात केली होती. इतकंच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केले आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर ह्या मराठी सिनेसृष्टीतील एक अव्वल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आज देखील त्यांचे प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. हल्ली त्या चित्रपटात काम करत नसल्या तरीही पुरस्कार सोहळ्यात, समारंभात व कार्यक्रमात त्या अवश्य उपस्थित राहतात.
मागील काही दिवसांपूर्वीच एका कोकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकात त्यांनी काम केले होते. अभिनेत्री वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवी शर्मा यांचे सुपुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे. आपल्या पतीसोबत त्या अनेक फिल्म्स फेस्टिव्हल मध्ये दिसतात. अजय व वर्षा यांच्या विवाहाला आता तब्बल 19 वर्षे पूर्ण झाली आहेत.
अजय शर्मा यांचे संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. तर वर्षा यांचे वडील हे प्रसिद्ध राजकारणी होते. मराठी इंडस्ट्रीत 1980- 1990 या काळात आपल्या सुंदर मनमोहक अदाकारीने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रींमध्ये “एव्हरग्रीन” म्हणून वर्षा उसगांवकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत त्यांनी कित्येक चित्रपटांत काम केले आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी गंमतजंमत, सगळीकडे बोंबाबोंब, खट्याळ सासू नाठाळ सून, हमाल दे धमाल, मजजाच मज्जा, भुताचा भाऊ, कुठं कुठं शोधू मी तिला, आमच्या सारखे आम्हीच, पसंत आहे मुलगी, शेजारी शेजारी, मुंबई ते मॉरिशस, एक होता विदूषक, ऐकावं ते नवलचं असे बरेच त्यांचे चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.