असे म्हटले जाते भाग्यासमोर कोणाचे ही काहीही चालत नाही, जर आपल्या नशीबात एखादी गोष्ट असेल तर आपण स्वतःहून काहीही न करता ती गोष्ट आपल्याला मिळते आणि जर आपल्या नशीब नसेल तर काहीही मिळत नाही.

असेच एक प्रकरण समोर आले आहे की एकट्या बाई आपल्या दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी मजूर म्हणून काम करायची! पैसे कमावण्यासाठी ती खूप कष्ट करायची आणि आपले घर चालवायची, पण जेव्हा तिच्या घरावर इनकम टॅक्सने छा’पा मा’र’ला तेव्हा ती बाई 100 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे हे समोर आले.

खरं तर, प्रकरण असे आहे की या स्त्रीचे नाव संजू देवी आहे तिच्या पतीच्या नि-ध-ना-नंतर संजू देवीकडे कमाईचे कोणतेही साधन नव्हते, तर संजू देवी स्वत: दोन मुलांचे पालन पोषण करण्यासाठी मजूर म्हणून काम करते. संजू देवी शेतीव्यतिरिक्त जनावरे राखतात आणि सांभाळतात. पण जयपूरमधील प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार संजू देवी 100 कोटींच्या मालमत्तेची मालकीण बनली आहे. तरीही, ती आपले कुटुंब चालविण्यासाठी पैश्या पायी हताश आहे.

जयपूर दिल्ली महामार्गावर प्राप्तिकर विभागाने 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीची 64 एकर जमीन शोधून काढली आहे, ज्याची मालकिन आदिवासी महिला आहे आणि त्यांना हे देखील माहित नाही की त्यांनी ही जमीन केव्हा खरेदी केली आणि ती जमीन कोठे आहे? प्राप्तिकर विभागाने या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

जयपूर-दिल्ली महामार्गावरील दं-ड गावात असणाऱ्या या जमिनींवर आयकर अधिकाऱ्यांनी आता जप्तीचे बॅनर लावले आहेत आणि या बॅनरवर लिहिले आहे ‘बेनामी संपत्ती निषेध अधिनियम अंतर्गत या जमिनीला बेनामी घोषित करत आयकर विभाग या जमिनीला आपल्या ताब्यात घेत आहे’.

5 गावांच्या 64 एकर जमीनीवर असे ही बॅनर लावले आहेत की या जागेची मालकीण संजू देवी मीना आहेत. पण या आता या जागेच्या मालकीण असू शकत नाही, म्हणून प्राप्तिकर विभाग त्वरित या जागेचा ताबा घेत आहे.

या प्रकरणाची चौकशी केली असता आम्ही दीपावास गावात पोहोचलो तेव्हा संजू देवी मीना म्हणाल्या की त्यांचा नवरा आणि सासरे मुंबईत नोकरी करायचे. त्या काळात, 2006 मध्ये, त्यांना जयपूरच्या अंबर येथे नेण्यात आले होते आणि एका ठिकाणी एका कागद पत्रावर अंगठा घेण्यात आला होता.

पण पतीच्या मृ-त्यूला 12 वर्षे झाली आहेत आणि तिची कोणती मालमत्ता आहे आणि कोठे आहे हे तिला माहिती नाही. पतीच्या मृ-त्यूनंतर घरी कोणीतरी येत असे आणि ₹5000 रुपये देऊन जात असे, त्यापैकी अडीच हजार रुपये तिची बहिणी स्वतःकडे ठेवत असे व अडीच हजार संजू देवीकडे ठेवण्यात येत असे. पण आता बरेच वर्षे झाली की कोणी पैसे देण्यासाठी येत नाही असे संजू देवी म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या कि मला आज समजले की माझ्याकडे इतकी मालमत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडे त-क्रा-र मिळाली होती की दिल्ली आणि मुंबईतील मोठ्या संख्येने उद्योजक आदिवासींच्या बनावट नावावर दिल्ली महामार्गावर जमीन खरेदी करीत आहेत. त्यांचा कागदावरच व्यवहार केला जात आहे. कायद्यानुसार आदिवासींची जमीन फक्त आदिवासी विकत घेऊ शकतात.

कागदावर खरेदी केल्यानंतर ते आपल्या लोकांच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नीवर सही करतात. यानंतर प्राप्तिकर विभागाने त्या खर्‍या मालकाचा शोध सुरू केला, तेव्हा कळले की, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील नीमच्या पो-लि-स स्टेशन तहसीलच्या दीपावास गावात जमीन मालक राहत आहेत. टेकड्यांच्या खाली वसलेल्या या गावात पोहोचणे त्यांना सोपे नव्हते पण त्यांनी ते काम पूर्ण केले आणि जमिनीचे खरे मालक शोधून काढले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.