अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीची पत्नी होत्या शाळेतल्या मैत्रीणी, हे फोटोज होतायेत प्रंचड व्हायरलं!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय सिनेमा यांच नात काहीस आधीपासूनच घनिष्ठ आणि अगदी जवळचं राहिल्याच आपल्याला पहायला मिळालं आहे. सध्या अशातच एक नवी गोष्ट समोर येताना पहायला मिळत आहे. परंतु ती थोडीशी हटके स्वरूपातली आहे. तर मुळात आपण जाणून घेऊयात नेमकी ही गोष्ट कशा संदर्भात आहे? तर ही बात आहे बॉलीवुडमधील टॉपची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीबाबतची. अर्थातचं ही अभिनेत्री म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटची पत्नीच आहे. तर मुळात इथे बात आहे ती, दोन क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या एका जुन्या आठवणींची आणि काहीशा नातेसंबंधाची. चला तर या बाबीवर काहीसा प्रकाश काकूयात. आज जगप्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहत असल्याची पहायला मिळते.

ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बऱ्याच गोष्टी, फोटो आणि काही प्रमाणात व्हिडिओजदेखील शेअर करत असल्याची पहायला मिळते. परंतु यावेळी मात्र ती तिच्या एखाद्या कामाशी अथवा इतर गोष्टीमुळे नाही तर चक्क तिच्या बालपणीच्या व्हायरलं होतं असलेल्या फोटोंमुळे चर्चेत आल्याची पहायला मिळते आहे. आणि तिचे हे बालपणीचे फोटो तिने एकटीनेच गाजवले असं नाही तर या फोटोंमधे आणखी एक व्यक्ती पहायला मिळते आहे, जिचा अगदी तमाम भारतभर एक वेगळाच थाट आहे. तर ही दुसरी व्यक्ती म्हणजेच आहे साक्षी धोनी, अर्थात महेंद्रसिंग धोनीची पत्नी. काही नाती कधी कुठे कशा पद्धतीने उलगडतील याचा नेम नसतो, तर मुळात दोन्ही क्रिकेटपटूंच्या पत्नी एकेकाळी एकमेकींच्या शाळेतल्या मैत्रीणी होती, ही बात थोडीशी आश्चर्यकारकच वाटते.

आता ही बाब ऐकून नक्कीच अनेकांना थोडसं आश्चर्यचकीत वाटलंच असेल. दोन उत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या बायका या चक्क शाळेतल्या एकमेकींच्या मैत्रीणी होत्या. सोशल मीडियावर काही फोटो चांगलेच व्हायरलं झाले आहेत. मुळात तुम्हाला हे माहिती आहे की, अनुष्का शर्माचे वडील हे सैन्यदलात होते. त्यांच एकदा पोस्टींग आसाममधे झालं असताना अनुष्काचं शिक्षण तिथे सेंट मेरी स्कुलमधे सुरू झालं. याचदरम्यान साक्षीदेखील तिथे शिक्षण घेत असताना दोघींची मैत्री जमली होती. २०१३ ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्का शर्मा म्हणाली होती की, साक्षी आणि मी एका छोट्याश्या गावात त्यावेळी शिक्षण घेत होतो. आत्ताच्या घडील त्या दोघींचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत असल्याचं पहायला मिळत आहे. दुसरीकडे साक्षीबद्दल बोलायचं म्हणलं तर तिचं हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून पुर्ण झालं.

साक्षी तशी डेहराडून या ठिकाणची आहे. परंतु तिचा जन्म आसाममधे झाला. आणि पुढील प्राथमिक शिक्षणदेखील तिचं इथेच पार पडलं. तिचे वडील आर के सिंग हे त्या काळात बिंगुरी चहा कंपनीसाठी काम करत असायचे. काही काळानंतर त्याचं कुटुंब डेहराडून येथेच स्थलांतरित होऊन तिथेच स्थायिक झालं. औरंगाबादच्या टॉप हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधून कोलकत्याला ताज बंगाल येथे इंटर्नशिप करत असताना साक्षीची पहिली भेट तिच्या होणाऱ्या पतीसोबत अर्थात धोनीबरोबर झाली. आणि पुढे आज बाकी सर्वांना ठाऊकच आहे. आज साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी यांना एक मुलगी आहे. दुसरीकडे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याही घरी नुकतीच एक मुलगी जन्माला आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!