अभिनेत्री तब्बूची बहिण फारच रागीट स्वभावाची होती, एकदा चक्क चंकी पांडेंना दिला होता मार!
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलीवुडमधे आपण आजवर असं कधीच पाहिलं नाही की एखाद्या अभिनेत्रीच करियर अगदी जोरात सुरू आहे. आणि त्यातच तिने सिनेसृष्टीला थेट रामराम ठोकून त्यातून ती बाहेर पडली. परंतु अशी एक अभिनेत्री सिनेसृष्टीत होऊन गेली जिचा एके काळी प्रचंड दबदबा सिनेसृष्टीत होता, तिच्या चाहत्यांची अगदी भडीमार होती. तिच्या प्रत्येक सिनेमाला हिटचा दर्जा मिळतच होता. कितीतरी सिनेमांमधे काम केलेल्या त्या अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा तर सर्वत्र रंगल्याच होत्या परंतु त्याखेरीज ती अभिनेत्री तिच्या रागीट स्वभावामुळेही प्रचंड प्रमाणात गाजली होती. या अभिनेत्रीच नाव आहे “फराह नाज”. ही अभिनेत्री 80 ते 90 च्या दशकात प्रचंड प्रमाणात प्रसिद्धीत आली होती. ती अभिनेत्री तब्बूची बहिण आहे. फराह नाज तिच्या काळात अनेक किस्स्यांमुळे तर गाजलीच होती परंतु एक खास गोष्ट म्हणजे, तिने अभिनेते चंकी पांडेंना मारलं ही गोष्ट सर्वांना आश्चर्यात पाडून गेली.

चला तर मग आपण जाणून घेऊयात हा नेमका किस्सा काय होता? फराह नाज कायम आपल्या नाकावर रागाचा तोरा घेऊन वावरते अशी तिची त्या काळी सिनेसृष्टीत ओळख होती. परंतु असं असलं तरीदेखील हे जोखिम पत्करून तिला आपल्या सिनेमाची अभिनेत्री बनविण्याकरता निर्माते अगदी एका पायावर तयार असायचे. त्याच कारण म्हणजे, तिचं अगदी रसिकप्रेक्षकांना भुरळ पाडणारं सौंदर्य. यश चोप्रा यांच्या फासले सिनेमाच्या दरम्यान काम करताना फराहने थेट त्यांच्या पत्नीसोबत वाद निर्माण केला होता. याशिवाय महत्वाचा गाजलेला किस्सा घडला तो अभिनेते चंकी पांडें यांच्यासोबत झालेल्या वादाचा. यावेळी तर त्यांनी चंकी पांडेंना असचं सोडलं नाही तर आपल्या हाताचा मारदेखील दिला होता.

ही गोष्ट त्या काळातली आहे ज्या काळात “कसम वर्दी की” हा सिनेमा शुट करणं चालू होतं. १९८९ सालातली ही गोष्ट आहे. आणि नेमकं फिल्मच्या सेटवर अभिनेत्री फराहचा राग अनावर झाला नी घमासान घडलं. “आय ऍम द मॅन” असं म्हणत चंकी पांडे या अभिनेत्रीची सेटवर मस्करी करत होते. सोबतच चंकी पांडेंकडून तिला इशारेदेखील करण्यात यायचे. आणि ही गोष्ट न पटल्यावर फराहने थेट सेटवर त्यांना चांगला चोप दिला. त्यांनी चंकी पांडेंना मारताना त्यांनी थेट रागाच्या भरात जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. चंकी पांडेंना या प्रकरणाने चांगलाच धडा शिकवला होता हे मात्र नक्की. खास विशिष्ट बाब म्हणाल तर केवळ चंकी पांडेच असे व्यक्तिमत्व नव्हते तर दुसऱ्या एका कलाकारावर अभिनेत्री फराह प्रचंड भडकली होती.

एकदा सिनेमांच्या निर्मात्यांनी रखवाला या सिनेमात फराहच्या जागी अनिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार तिच्या भुमिकेसाठी माधुरी दिक्षितच्या नावाचा विचार करायच ग्राह्य धरलं होतं. हे कानावर पडताच अभानेत्रीने अनिल कपुरला फोन करत धमकी दिली आणि शिवाय माधुरीला फोनवर बोलणी केली. स्वत:च्या सिनेमातील आयुष्याव्यतिरिक्तही फराह तिच्या खाजगी आयुष्याला घेऊन फारच चर्चेत राहिल्याची पहायला मिळाली. दिग्गज अभिनेते दारा सिंह यांचा मुलगा विंदु याच्यासोबत तिने लग्न केलं. परंतु पुढे तब्बल ७ वर्षांनी दोघेही वेगळे झाले. फराह त्यानंतर थोडा वेळ घेऊन लग्नबंधनात अडकली आहे. २००५ साली फराह नाज शेवटची सिनेसृष्टीत चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आजतागायत ती बॉलीवुडच्या झगमगाटापासून दूर राहत असल्याची पहायला मिळते आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!