आज सिने इंडस्ट्रीत ज्या अभिनेत्या आणि अभिनेत्री चं नाणं खणखणीत वाजतय ते ग्लॅमरस रूप घेऊन आयुष्य जगत आहेत. लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. बरं या कलाकार एकमेकांचे नातेवाईक खुप असतात. आता एक प्रसिद्ध मालिका आहे, जिचं नाव आहे, येऊ कशी कशी मी नांदायला.
म्हणजे ती येणार याआधीच कशी प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे आता 4 जानेवारी नवीन वर्षात ती चालू झाली आहे. त्यात एक काकूंची भूमिका ज्या अभिनेत्री ने साकारली आहे त्या इंडस्ट्रीत जेष्ठ प्रसिद्ध अश्या कुणाच्या तरी नातेवाईक आहेत. आता कुणाच्या चला तर मग जाणून घेऊयात.
“येऊ कशी तशी मी नांदायला” ही नवी मालिका ४ जानेवारीपासून झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. मालिकेच्या पहिल्याच भागात अनेक जुन्या, नव्या चेहऱ्यांची ओळख झाली. यात प्रमुख नायकाच्या भूमिकेत ‘शाल्व किंजवडेकर’ (ओमकार) तर नायिकेच्या भूमिकेत ‘अन्वीता फलटणकर'(स्वीटू) झळकत आहेत. दीप्ती केतकर, शुभांगी गोखले, अदिती सारंगधर अशा कलाकारांचीही साथ या मालिकेला मिळाली आहे.
मालिकेत स्वीटूच्या काकूंची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “शुभांगी भुजबळ सावरकर” यांनी . आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
कोण नसेल ओळखत यांना. ज्यांचं नाव आहे, शुभांगी भुजबळ. या मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. भिकारी, वाघी, जुगाड, संगीत एकच प्याला, चार दोन तुकडे अशा चित्रपट आणि नाटकांतून त्यांनी अभिनय साकारला आहे.
त्यांनी अनेक कलेत आपलं नशीब अजमावलं आहे. त्याचप्रमाणे विविध मंचावरून नाटकांचे अभिवाचन त्यांनी केले आहे. खूप कमी जणांना माहीत आहे की शुभांगी भुजबळ या मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते “जयंत सावरकर” यांच्या सून आहेत. मराठी नाटक, चित्रपट तसेच हिंदी चित्रपटातून जयंत सावरकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. “कौस्तुभ सावरकर” हा त्यांचा मुलगा मराठी चित्रपटातून लेखक आणि दिग्दर्शकाची धुरा सांभाळत आहे.
याशिवाय दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर अभिनित “चौकट राजा” या चित्रपटात कौस्तुभ सावरकर यांनी बालपणीचे दिलीप प्रभावळकर साकारले होते ही माहिती देखील बहुतेकांना परिचयाची नसावी. कौस्तुभ सावरकर यांची काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या ठाणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काकूंची भूमिका करणाऱ्या लोकप्रिय अश्या अभिनेत्री ला पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती होत जाओ. आणि वेगवेगळ्या भूमिका वठवत राहो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.