एक मालिका देवाचा विषय घेउन आलेली आहे. आणि खूप कमी काळात रसिकांना भुरळ टाकून जात आहे. आता ही मालिका कोणती असा आपला नेहमीचा प्रश्न पडला असेल. त्यातला प्रमुख भूमिका करणारा अभिनेता तर खूप लोकप्रिय झाला आहे. त्यालाच देव मानायला लागले आहेत लोक. चला मग सविस्तर जाणून घेऊ तो अभिनेता कोण ? आणि मालिका कोणती ?

सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे जय जय स्वामी समर्थ. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे

जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यामुळे कमी कालावधीत ही मालिका तु’फा’न लोकप्रिय होत आहे.

ही मालिका सुरु झाल्यापासून यात स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं सांगा बरं कोण असेल ? आता तुम्ही मालिका पाहत असाल तर नक्कीच माहीत असेल.

या मालिकेत अक्षय मुदवाडकर या अभिनेत्याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.लहानपणापासून अभिनयाची आवड असणारा अक्षय मूळचा नाशिकचा. नाशिक ही त्याची जन्म भूमी आणि मुंबई कर्मभूमी. त्याला या क्षेत्रातील आवड खूप पूर्वीं पासून बालपणापासून होती. त्याने अभिनेता होण्याचं स्वप्न लहानपणी पाहिलं आणि मोठेपणी पूर्ण केलं.

या मालिकेव्यतिरिक्त त्याने अनेक प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं केली आहेत.गांधी हत्या आणि मी’,’ द लास्ट व्हॉइसरॉय’ या नाटकात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याचे ही नाटकं खूप पसंतीस उतरलेली आहेत.

स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतही तो झळकला आहे.अक्षयचं एक युट्यूब चॅनेल असल्याचं देखील सांगण्यात येतं. बरं एवढंच काय तर अक्षयला सोशल मीडियावर फार कार्यरत राहण्याची सवय आहे. ज्यात तो काय करतो हे कळवत राहतो.

अक्षय ला अजून खूप मोठं व्हायचं आहे, तर त्याला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. कारण समर्थांचा रोल तर त्याने खूप गाजवला आहे. आणि तो घराघरात गेला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.