Pic Credit - Insta/SaneShashank
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

कलाकार म्हंटलं की त्यांच्या भेटी गाठी होणार. आणि मीडिया त्यांच्या जोडीचा अंदाज बांधणार. म्हणजे तसे कलाकार ही खरेच एकमेकांना डेट आणि प्रेम करत असतात. म्हणजे तसे अनेक उदाहरणे आपण मराठी कलाकार यांच्या मध्ये पाहू शकतो. सध्या एक जोडी एकमेकांना डेट करून प्रेमात पडलीय का या गोष्टी त सध्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होतायत. ते दोघे कोण ? चला तर मग जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे. मात्र, या लग्नसोहळ्यानंतर चर्चा रंगली ती अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी या दोघांची.

सिद्धार्थ-मितालीच्या लग्नात विराजस आणि शिवानीने एकत्र हजेरी लावली होती.विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला विराजस-शिवानी या दोघांनीही मॅचिंग कपडे परिधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. विराजस-शिवानी यांनी जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं नसलं तरीदेखील ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

शिवानीने विराजससोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. १५ फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने Yup असं कॅप्शन देत विराजस सोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने हार्ट इमोजीदेखील टाकली होती. तेव्हापासून ही जोडी रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

विराजसनेदेखील शिवानीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली. विराजस हा लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

विराजस अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक प्रायोगिक नाटकं आणि चित्रपटांचं लेखन केलं आहे.

सध्या तो झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे.

दोघांनाही पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.