धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित, आणि माधुरी दीक्षित म्हटलं की सर्वांसमोर ऊभी राहते ती एक सुंदर अभिनेत्री जिने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, केवळ आपल्या मनमोहन अदांनीच नाही तर अभिनयाने व नृत्याच्या दिलखेच अदांनीही तिने सर्वांना घायाळ करून सोडलं होतं. तिच्या सोंदर्याच्या बाबतीत खास वाटा अर्थात तिच्या त्या गोड स्मितहास्याचाही अपुल ठरला आहे. तर आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट तिच्या लग्नाबाबतची सांगणार आहोत.
माधुरी दीक्षित हीने 1999 या वर्षी श्रीराम नेने यांच्यासोबत विविह केला. आणि आता 2020 मधे दोघांच्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. अनेकदा झगमगत्या बाॅलिवूडच्या व्यक्तीरेखा भिन्न असतात आणि बरीचशी लग्ने ही सहसा काडीमोड होऊन वेगळी होताना आपण पाहिली आहेत पण अशा झगमगत्या दुनियेत राहूनही माधुरी दीक्षितचा नेनेंसोबतचा 21 वर्षांचा प्रवास अगदी सुखाचा व नव्या पिढीला “कपल गोल्स” सेट करणारा ठरला असचं म्हणावं लागेल. अनेकदा बऱ्याचशा कार्यक्रमात ह्या दोघ्यांची जोडी आनंदी व उत्साही वातावरण ठेवणारी असते. या दोन कपल जोडीमधे कायमचं प्रेम एकमेकांबद्दल आपलेपणाची भावना आणि बरचं काही टिकून राहिलं आहे, अर्थातच त्यामुळे माधुरी आणि नेने ह्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते फार सुखी आणि समाधानी जगत आहेत. श्रीराम नेनेंनी सांगितलं की माधुरी तिच्या करियरबद्दल आणि ध्येयावर तिचं पहिलं प्रेम आहे आणि प्रत्येकाचं ते असायलाही हवंच.
नव्वदीच्या दशकात माधुरी दीक्षित सिनेसृष्टीत अगदी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक महत्वाची अभिनेत्री होती. लाॅस ऐंजिलिस या ठिकाणी श्रीराम नेने आणि माधुरी यांची पहिल्यांदा ओळख झाली, आणि अर्थातच त्यापुढे या दोघांची प्रेमकहाणी घडली. माधुरीने एका मुलाखतीत सांगितल होतं की, नेनेंना पहिल्यांदा भेटल्यावर त्यांना ठाऊक नव्हतं की ती एक अभिनेत्री आहे. त्याच दरम्यान एकदा नेनेंनी सहज विचारलेल्या प्रश्नाला लगोलग उत्तर देऊन माधुरी बाईकवरून डोंगरावर फिरण्यासाठीही गेली होती. त्या नंतर काही काळ गेला आणि नेनेंनी विचार केला की जर आपण प्रेमात आहोत तर आता लग्नही करायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढे माधुरी व श्रीराम नेने यांनी कशाचीही तमा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही १७ आॅक्टोबर १९९९ साली विवाहबंधनात अडकल्या गेले. त्या दिवसापासून आजपर्यंत या जोडप्याने गेल्या २१ वर्षात अनेक आठवणी जपल्या आहेत.