Covid Vaccine Update

जगातील सर्वच देशांमध्ये सध्या कोरोनाच्या जागतिक साथीच्या विषाणूचा प्रचंड त्रास होत आहे. यातुन कायमची सुटका करून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना लस शोधण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेत आहेत. याच दरम्यान, लंडनमधील एका मोठ्या रुग्णालयाने ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीला मान्यता दिली आहे. लंडनच्या एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, रुग्णालयाने आपल्या कर्मचार्‍यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाद्वारे निर्मित कोरोना लसीची पहिली ढोस घेण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाला कोरोना लस पुरविली जाईल.

तिसऱ्या टप्प्यात जगभरात 10 कोरोना लस चाचण्या होत आहेत..

डब्ल्यूएचओच्या ( WHO ) म्हणण्यानुसार एकूण 193 कंपन्या ह्या कोरोना लस तयार करण्यात गुंतलेल्या आहेत.

यापैकी 42 लस या क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत. तर यातील 10 लसी चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात आहेत. या लसींच्या चाचणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. असा विश्वास दर्शविला जात आहे की लस सार्वजनिक वापरासाठी देखील लवकर मंजूर होऊ शकतात.. तर दुसरीकडे भारत बायोटेक कंपनीच्या लसीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीस मान्यता मिळाली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत देशी बायोटेक “कोवाक्सिन” लस विकसित करीत आहे.

भारतात लसीची स्थिती काय आहे?

भारतात बनवल्या जाणार्‍या जायडस कैडिला लस दुसर्‍या टप्प्यात आहे. आता बायोटेकच्या लसीला चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मान्यता मिळाली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लसची तिसरा टप्पा क्लिनिकल चाचणी भारतात सुरू आहे. ही लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. असे मानले जाते की 2021 सुरू होण्यापूर्वी त्याला मंजुरी मिळू शकेल. ही प्रथम लस देखील असू शकते.