काही अभिनेत्रींना खूप संघर्ष करावा लागतो तर काहींना पहिल्याच वेळी संधी मिळून जाते. त्यात काही तर आधी छोटी मोठी कामे करून पुढं मोठं काम मिळेल या आशेत असतात. जर सातत्य ठेवलं तर कामे मिळतात, हेही तितकच खरं आहे. अनेक अश्या अभिनेत्री आहेत की ज्यांनी हिंदी मालिका केलेल्या आहेत.

त्यात काहींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर काहींनी छोटया. पण पडद्यावर काम करून ओळख मात्र मिळवलेली आहे. जर समजा आपण त्यांना आधी कुठं पहिल्यालं असेल तर आपल्याला त्यांच सध्याचं कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतं. आज अशीच एक अभिनेत्री एका मराठी वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकेतून पदार्पण करत आहे. तिच्या मालिकेचा प्रोमो लोकांना फार आवडत आहे.

त्या मालिकेचं नाव आहे सुंदरा मनामध्ये भरली. होय, कलर्स मराठी वर ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचं शूटिंग सध्या सुरु आहे. या मालिकेत जाड मुलीची म्हणजेच सुंदराची भूमिका साकारत आहे, अभिनेत्री अक्षया अरविंद नाईक. जर आपण प्रोमो पाहिला असेल तर आपल्याला तिला कुठं तरी पाहिल्याचं वाटत असेल. जरा थोडं आठवून बघा म्हणजे लक्षात येईल.

हरकत नाही आम्हीच सांगतो. सुंदरा मनामध्ये भरली मधील सुंदरा म्हणजेच अक्षया नाईक हीला आपण एका हिंदी मालिकेत पाहिलेलं आहे. जी मालिका एकेकाळी खूप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. त्या मालिकेचं नाव आहे ‘ ये रिशता क्या कहलाता है ? या मलिकेत पाहिलं असेल. त्यात तिने चांगलीच भूमिका केलेली आहे. प्रेक्षकांना ही तिचा अभिनय फार आवडला होता.

कलर्स मराठीवर गोड चेहऱ्याची वजनदार असलेली अक्षया ही अभिनेत्री लवकरच सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत दिसणार आहे. तिची ही पहिलीच मराठी मालिका आहे. पण याआधी तिने हिंदीत काम केलेलं आहे. तिने अनन्या माहेश्वरी म्हणून लोकप्रिय भूमिका केली होती. ती मराठी कुटुंबात जन्मलेली आहे. तिने सावधान इंडिया मध्येही काम केलेलं आहे.

अक्षया मुळची मुंबईची. जन्म ही मुंबईतचं झाला. ती लहानपणापासुनच अशी वजनदार आहे; पण तिने कधीच त्याचा बाऊ केला नाही. वाईट वाटून घेतलं नाही. आपल्या कामावर लक्ष दिलं. तिचं वजन सध्या पंच्याहत्तर किलो आहे.

ती एक उत्तम व्हाईस कलाकार सुद्धा आहे. तिला उत्तम डान्स सुद्धा करता येतो. अनेक जाड मुली गिल्टी फील करतात पण अक्षया उलट जाड असल्याचा अभिमान फील करत आहे. म्हणून ती यशाचं उतुंग शिखर गाठ आहे.

तिने अनेक नाटकांमधून काम केलेलं आहे. तिची आवडती अभिनेत्री आहे प्रीती झिंटा. तर रसिकानो समजूतदार, धाडसी अशी सुंदर, गोड आणि निरागस अभिनेत्री लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तर मग सुंदरा मनामध्ये पाहायला तयार आहात ना ?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.