ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड, (टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप)च्या गेल्या वर्षी मुंबईत लाँच झालेल्या, पहिल्या फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या यशानंतर, आता टाइम्स ग्रुपने मुंबईतील पवई येथे अलीकडेच दुसरे फेमिना फ्लाँट स्टुडिओ आउटलेट सुरू केले आहे. टाइम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप दहिया यांच्यासह फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान ही उपस्थित होती.

फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची ही पहिली फ्रँचायझी आहे. जी केस, मेकअप, नखे आणि त्वचेविषयक सौंदर्य सेवा देताना जागतिक पातळीवरील चालू ट्रेंडनूसार सेवा प्रदान करते.

लाँचिंगविषयी बोलताना टाईम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे सीईओ संदीप दहिया म्हणाले, “आमच्या फ्रँचायझी पार्टनरच्या सहकार्याने आमचा पहिला फ्रँचायझी स्टुडिओ सलून सुरू करताना आम्ही खूप उत्साही आहोत. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून सौंदर्य संकल्पना परिभाषित करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहील.” ते पुढे म्हणतात, ” पुढील 4 महिन्यांत, आम्ही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून देशातील आणखी चार शहरांमध्ये, आणखी 8 नवीन ठिकाणी विस्तारित करण्याची योजना आखत आहोत. सौंदर्यविषयक जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या सेवा हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. “

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान म्हणाली, “फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून पाहून मी खूप प्रभावित झाले. माझ्यासाठी सलून हा एक खास आणि खासगी अनुभव आहे, जिथे प्रत्येक भेटीत आपण 2 ते 3 तास घालवतो. आणि म्हणूनच तेथे डिझाइन, दिलासादायक अनुभव आणि सकारात्मक वातावरण खूप महत्वाचे असते. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनमध्ये, मला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. “

फेमिना फ्लाँटस्टुडिओ सलूनमध्ये, नवे प्रयोग आणि कौशल्य ह्याची योग्य सांगड घातली जाते. लॉन्चिंगबद्दल बोलताना फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची फ्रँचायझी पार्टनर स्मिता बिजू म्हणाली, “अत्यंत प्रतिष्ठित ब्रँडशी संलग्न होऊन काम करणे, हा माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप चांगला अनुभव आहे. गेल्या काही महिन्यांपासून, मी फेमिना फ्लाँट स्टुडिओ सह काम करत आहे आणि जागतिक पातळीवरील चालू ट्रेंडनूसार सौंदर्य सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत. “

सौंदर्याचा समग्रतेने विचार करताना फिटनेस आणि पोषण आहाराचा ही समावेश होतो. म्हणूनच या क्षेत्रातही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून, डॉ. मिकी मेहता आणि सांची एस. नायक ह्या तज्ञांसोबत काम करत आहे. ह्यासह, नम्रता नाईक (त्वचा आणि नेल केअरची तज्ञ) आणि तनवीर शेख (केसांची निगा राखण्याचे तज्ञ)सह नामांकित सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीबरोबरही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून काम करतात.

पोषण आहार सल्लागार सांची एस. नायक, (फेमिना फ्लाँट न्यूट्रिशन एक्सपर्ट) म्हणतात की, “फेमिना फ्लाँट स्टुडिओ नवीन ठिकाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचताना पाहून मला आनंद होत आहे. फेमिना फ्लाँटसोबत मी काही काळापासून संलग्न आहे आणि मला खात्री आहे की चांदिवली, पवई आणि आसपासच्या भागातील लोकांसाठी हा एक नवीन आणि वेगळा अनुभव असेल. ”

फेमिना फ्लाँट स्टुडिओचे अभिनंदन करताना, जागतिक पातळीवरचे आरोग्य गुरू आणि कॉर्पोरेट लाइफ कोच डॉ. मिकी मेहता (फेमिना फ्लाँट फिटनेस एक्सपर्ट)म्हणाले की, “सौंदर्याची निगा राखताना त्यात फिटनेसचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. मी फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनचा भाग असल्याचा मला आनंद आहे. मला खात्री आहे की ही संकल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. “