सध्याच्या घडीला तरी मराठी सिनेसृष्टीत अनेक विविध हालचाली रोज सुरू असतात. त्यात नवनवीन प्रयोगदेखील केले जातात. कधीकधी भिन्न विभिन्न साच्यात काम करणारे कलाकार एकत्र आणूनदेखील काहीतरी नवीन कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची तसदीदेखील घेतली जाते. मुळात सध्या असचं काही एका नव्याकोऱ्या येणाऱ्या सिनेमातून पहायला मिळण्याची शक्यता आहे.
ही गोष्ट आहे ती म्हणजे, सुयश टिळक आणि मिताली मयेकर यांच्याबाबतची. मितालीचा नुकताच सिद्धार्थ चांदेकर या अभिनेत्यासोबत विवाहसोहळा पार पडला आहे आणि त्यानंतर ती थेट मोठ्या पडद्यावरून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार म्हटल्याने निश्चितच तिचे चाहते फार खुश आहेत. सध्या या दोघांच्या अपकमिंग सिनेमातलं एक गाणं रिलीज झालं आहे ज्यात मिताली म्हणतेयं “हॅशटॅग प्रेम”. अर्थात हे गाणं थोडसं मॉडर्न लहेजाचं बनवल्या गेल्याने काही मराठी रसिकांना ते रूचलं नसलं तरी तरूणाईला मात्र हे आवडलं आहे.
आणि तरूणाईकडून या गाण्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. मराठी चित्रपट नात्यांच्या बाबतीत अनेक विविध विषय एका ठराविक मांडणीमधून मांडून ते रसिकप्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि या सिनेमाकडूनही तशाच प्रकारची आशा असल्याचं दिसतं आहे.
“हॅशटॅग प्रेम” हे सिनेमाचं टायटल साँग आहे, अर्थात सिनेमाचं नावही तेच आहे. प्रेमकथेच्या बाबतीत सिनेमा असणार असल्याने प्रेमाबद्दल हल्लीची पिढी ज्या काही पद्धतीने अपडेट होत आहे, त्या अनुषंगाने या सिनेमाच्या टायटलच्या गाण्यात काही इंग्रजी शब्द वापरण्यात आल्याने अनेकांचा त्यावर आक्षेप आहे. काहींच्या मते, गाणं पूर्णत: मराठी हवं किंवा पूर्णत: इंग्रजी हवं.
इतर सर्वकाही सोडलं तर सुयश टिळक आणि मिताली हे दोघे एका सिनेमात पहायला मिळणार हीच खरी गम्मत रसिकप्रेक्षकांसाठी असणार आहे. मिताली मयेकर हिने आजवर मोठ्या पडद्यावर उर्फी, हिंदी सिनेमा बिल्लू, स्माईल प्लीज, आम्ही बेफिकीर यांमधे काम केलं आहे.
याशिवाय महत्वाचं म्हणजे ती सध्या “लाडाची मी लेक गं” या मालिकेतही काम करते आहे. झी युवाच्या माध्यमातून आलेल्या आणि त्यावेळी तरूणाईच्या मनावर प्रचंड ताबा मिळवलेल्या फ्रेशर्स या मालिकेतही मिताली चांगल्या भुमिकेत झळकली होती. याशिवाय यारी दोस्ती या सिनेमातूनही तिने आपल्या अभिनयाची लकब प्रेक्षकांना दाखवून दिली होती. दुसरीकडे सुयश टिळक या अभिनेत्याबाबत बोलायचं झालं तर तो महाराष्ट्राच्या तमाम अभिनेत्यांपैकी स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग असलेला अभिनेता आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या या अभिनेत्याने “का रे दुरावा” या मालिकेमधून सर्व जनतेची मने जिंकून घेतली होती. कॉफी आणि बरचं काही, हिंदी सिनेमा खाली पिली, क्लासमेट्स यांसारख्या कित्येक सिनेमांमधे त्याने त्याच्या भुमिकेला न्याय देत काम केल्याच पहायला मिळतं.
सध्या सुयश टिळक हा शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्याची या मालिकेतील भुमिकाही रसिकप्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एक घर मंतरलेलं, पुढचं पाऊल, दुर्वा, बापमाणूस यांसारख्या मालिकांमधूनही तो अनेकदा त्याची छाप पाडून गेला आहे. मुळात आता मिताली आणि सुयस टिळक एकत्र एका सिनेमात कशा पद्धतीने आपल्या भेटीस येणार हे पाहणं उत्सुकता वाढवणारं ठरणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!