मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्व ठिकाणी एकच चर्चा रंगली आहे. याशिवाय ही चर्चा खरतरं संपूर्ण महाराष्ट्रभर रंगलेली पहायला मिळते आहे. ही चर्चा आहे प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीने केलेल्या एका गजब गोष्टीबाबतची. आपल्या सर्वांना माहितच आहे की, “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या अर्थात येसूबाईंच्या भुमिकेत आपल्याला प्राजक्ता गायकवाड ही अभिनेत्री पहायला मिळाली होती. तिने पार पाडलेल्या एवढ्या धी’र’गं’भी’र आणि महत्वपूर्ण भुमिकेचा तमाम महाराष्ट्राला निश्चितच ल’ळा लागला होता. प्राजक्ता गायकवाड तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर बरीच ऍ’क्टि’व्ह असलेली पहायला देखील मिळते.

आणि ती नेहमीच तिचे कधी कार्यक्रमाचे, कधी फोटोशुटचे फोटो, कधी व्हिडिओ अशा गोष्टी शेअर करत असते. तर नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याच पहायला मिळतं आहे. या व्हिडिओमधे प्राजक्ता गायकवाड चक्क साडी परिधान करून जिममधे वर्कआउट करताना पहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktagaikwad_official)

तिचा हा व्हिडीओ थोडासा जुना असूनदेखील पुन्हा एकदा तो नव्या जोमाने ट्रेंड होताना दिसत आहे. मुळात शक्यतो एखादा अभिनेता वा अभिनेत्री किंवा इतर कोणीही व्यक्ती जेव्हा वर्कआउट करत असतो तेव्हा त्यानुसार फ्लेक्सिबल कपडे घालून त्या गोष्टी ते करत असतात. परंतु इथे प्राजक्ताने मात्र गजबच गोष्ट करून दाखवली आहे. प्राजक्ताने थेट पारंपरिक अंदाजात जिममधे वर्कआउट केल आहे.

प्राजक्ता गायकवाड या व्हिडिओमधे स्पष्टपणे केसांचा अं’बा’डा बांधून, मोगऱ्याचा गजरा लावत, कपाळावर कुंकवाचा टि’ळा लावत असा भरजरी शृं’गा’र करून वर्कआउट करत असताना पहायला मिळाली होती. तिच्या या लुकची आणि तिने परिधान केलेल्या साडीची रसिकप्रेक्षकांमधे फारच पसंती वाढली आहे. तिच्या या लुक्सवर अनेक चांगल्या कमेंट्सचा वर्षावदेखील झालेला आहे.

हा व्हिडीओ व्हायरलं व्हायला क्षणधरही वेळ लागला नाही, अगदी अल्पावधीत या व्हिडिओने सर्वांचीच मने जिंकून घेतल्याच पहायला मिळालं. प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीच्या मराठी सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीची चांगली घडी बसलेली आहे. तिने स्वत:च्या कलेच्या मेहनतीवरून स्वत:ला आजवर सिद्ध करत अनेक चांगल्या भुमिका पार पाडल्या आहेत. “आई माझी काळुबाई” या मालिकेत ती पहायला मिळत होती.

परंतु तिने अचानकपणे अलीकडेच या मालिकेचा समारोप घेतला आहे. तिने मालिका का सोडली? याच कारण अद्याप स्पष्ट नाही. “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेकरता प्राजक्ताने तलवारबाजी व घो’डे’स्वा’री’चं विषेश प्रशिक्षण देखील घेतलं. नांदा सौख्य भरे, संत तुकाराम अशा मालिकांमधेही तिने काम केलं आहे.

सोशल मिडियावर प्रचंड ॲक्टीव्ह राहणाऱ्या प्राजक्ताने नुकतचं एका अभुतपूर्व पोस्टद्वारे तिच्या आगामी प्रोजेक्टची हिंट चाहत्यांना दिली आहे. “गं’ध आपल्या मातीचा” असा कॅप्शन एका फोटोला तिने दिला आहे. या फोटोत हातात फावडे घेऊन ती एका शेतात ऊभी असल्याचं पहायला मिळतं आहे. प्राजक्ता नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलं यात तिळमात्र शं’का नाही. तिने साकारलेल्या येसूबाईंच्या भुमिकेला नक्कीच तो’ड नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!