मित्रांनो!, दिशा वाकानी म्हणजेच जेठालालची पत्नी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत कधी परतणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशा लवकरच या मालिकेत परतणार असल्याचे म्हटले जात आहे. दिशाच्या फॅन्सना तिला पुन्हा एकदा दयाबेन या भूमिकेत पाहायला मिळत असल्याने सध्या ते चांगलेच खूश आहेत. दिशा मालिकेत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करत असते.
तिने काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचा बालपणीचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत दिशा खूपच छान दिसत असून तिने यात चनिया चोली घातली आहे. तसेच केसांची खूप छान वेणी देखील बांधली आहे. तिच्या चेहऱ्यावर आपल्याला खूपच छान हास्य पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडत असून ती या फोटोत खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे.
दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. ती मालिकेत सुरू असलेल्या नवरात्री सेलिब्रेशनच्या दरम्यान मालिकेत कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे.
नुकतेच तिने आपल्या पहिल्या पगाराचा इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता. कोईमोईला दिलेल्या मुलाखतीत दिशा वकानीने आपल्या करिअरबद्दल सांगितले आणि त्यावेळी तिने आपल्या पहिल्या पगाराचा अनुभव सांगितला. दिशाने गुजराती रंगभूमीवरुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असताना दिशाने एका व्यवसायिक नाटकात काम केले होते.
या नाटकाचे तिने पाच प्रयोग केले होते. तिची भूमिका खूपच लहान होती. यासाठी तिला २५० रुपये पगार मिळाला होता. हे पैसे तिने आपल्या वडिलांना दिले होते. तिचा पहिला पगार पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पैसे तिच्या वडिलांनी अद्याप खर्च केलेले नाहीत. ते त्यांनी एखाद्या पुरस्काराप्रमाणे फ्रेम करुन ठेवले आहेत. हा अनुभव सांगताना दिशा फारच भावूक झाली होती.
दिशाने आपल्या कारकीर्दीत 1-2 नव्हे तर चक्क 9 सिनेमात काम केले आहे. दिशाला सुरूवातील बी-ग्रेड सिनेमात काम करावे लागले. 1997 मध्ये दिशाला तिचा पहिला सिनेमा मिळाला. ‘कामसिन – द अनटच’. १९९९ मध्ये ‘फूल और आग’ सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली . सिनेमात मिथुन, जैकी श्रॉफ, हरीश आणि अरुणा ईरानीसारखे नावाजलेले कलाकार होते. आमिर-शाहरुख-ऋतिकसोबतही तिने काम केले आहे. २००८ हे वर्ष दयाासाठी थोड्याफार प्रमाणात चांगले ठरले. या वर्षात तिने ‘जोधा अकबर’, ‘सी के कंपनी’ आणि ‘लव स्टोरी 2050’ सारखे सिनेमात काम केलेले आहे.