मित्रांनो! बॉलीवूडमधील सर्वात चर्चित परिवार जर कोणता असेल, तर तो आहे, बच्चन परिवार. या परिवाराच्या छोट्यातील छोट्या बातमीवरही लोकांची नजर असते. आणि अशातच एक बातमी येतेय. आराध्याची सुपरमॉम असलेली ऐश्वर्या राय बच्चन देणार गुडन्यूज? दुसऱ्यांदा होणार आई?, फोटोमुळे चर्चेला उधाण. आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐश प्रसिद्ध आहे.

ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्ट्या, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही. सातासमुद्रापार कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.

नेहमीच बच्चन बहू ऐश्वर्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. मात्र तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे आता दुसरीच चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या जिथे जाते तिथे ऐश्वर्या आता लुज कपडे परिधान करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचे पोट लपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशाप्रकारच्या ड्रेसिंगमुळे ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई बनणार असून ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्याची बदलेली स्टाइल पाहूनच तिच्या चाहत्यांना हा प्रश्न पडणार स्वाभाविक आहे. तुर्तास या बातमीची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने याबद्दल बोललेले नाही. तसेच ऐश्वर्याकडूनही कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही.

ऐश्वर्या राय बच्चन यांची नुकतीच समोर आलेली छायाचित्रे पाहून ऐश्वर्या रायचं वजन वाढलं आहे आणि तिचा बेबीबंप या छायाचित्रांमध्ये दिसू शकतो. ही छायाचित्रे पाहून लोकही असा अंदाज लावत आहेत की लवकरच ऐश्वर्या लवकरच दुसऱ्यांदा आई बनणार आहे. यात ऐश्वर्या, अभिषेक आणि मुलगी आराध्या शूटच्या वेळी सारथ कुमारच्या घरी पोहोचल्या. यावेळी ही छायाचित्रे घेण्यात आली

या छायाचित्रांमध्ये ऐश्वर्या ब्लॅक ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तसेच तिने कोणतेही मेकअप केले नाही. तसेच हे फोटोज पाहून असे दिसते की जणू ऐश्वर्याचे वजन वाढले आहे. याशिवाय काळजीपूर्वक पाहताना त्याचे पोटही किंचित वाढलेले दिसते. हे पाहून लोकांनी ऐश्वर्याच्या गरोदरपणाविषयीही अनुमान काढण्यास सुरुवात केली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकचे 2007 मध्ये लग्न झाले होते. 2011 मध्ये मुलगी आराध्या जन्मली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी कुछ ना कहो, गुरु, रावण, धूम 2, धाई अक्षर प्रेम के, सरकार राज आणि बंटी और बबली अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.