‘देवमाणूस’मधील टोण्या आणि डिम्पिची आई म्हणजेच मंगल खऱ्या आयुष्यात कशी दिसतेय ते जर पाहिले तर आश्चर्यचकित व्हाल. चला तर मित्रांनो! जाणून घेऊ यात या मंगल बद्दल काही रंजक गोष्टी… अंजली जोगळेकर ही ‘देवमाणूस’ मालिकेत अगदी टिपिकल आई बनलीये. पण रिअल लाईफमध्ये ती चांगलीच ग्लॅमरस रहाते.

मित्रांनो!, आपण सर्वजण जाणतोच की, झी मराठीवरील ‘देवमाणूस’ Devmanus या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेने मराठी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता अगदीच शिगेला नेली आहे. मालिकेच्या रहस्यमयी आणि थरारक कथानकाने प्रेक्षकांवर जणू एखादी जादू केली आहे असेच वातावरण आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखाही रसिक चाहत्यांच्या पसंतीत उतरल्या आहे.

देवीसिंग, एसीपी दिव्या, डिंपी, टोण्या, टोण्याची आजी ही पात्र तर कमालीची लोकप्रिय झाली आहेत. आज आम्ही या अतिशय थरारक वळणावर येऊन ठेपलेल्या सुप्रसिद्ध मालिकेतील अशाच एका लोकप्रिय झालेल्या व्यक्तिरेखेची आणखी काही वैशिष्ट्ये सांगणार आहोत. ती कोण म्हणाल तर ती आहे मंगल. होय, टोण्या व डिंपीची आई मंगल हिची व्यक्तिरेखा अभिनेत्री अंजली जोगळेकर Anjali Joglekar हिने अतिशय समर्थपणे साकारली आहे.

अंजली जोगळेकर ही ‘देवमाणूस’ मालिकेत अगदी टिपिकल मराठमोळी आई बनलीये. पण तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये मात्र ती चांगलीच मॉडर्न आणि ग्लॅमरस आहे. शॉर्टफिल्म्स प्रेमींसाठी अंजली जोगळेकर हे नाव अजिबात नवीन नाही. तिने आजवर अनेक प्रसिद्ध  शॉर्ट फिल्म्समध्ये ताकदीने भूमिका साकारल्या आहेत.

‘काव काव’ या शॉर्ट फिल्ममध्ये तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. वंदना, सावित्री, दिवली नाही विझता कामा, फिंगरप्रिंट, सिलवट या शॉर्ट फिल्म्समध्येही ती झळकली आहे. तिच्या ‘सिलवट’ला तर अनेक पुरस्कार आणि नामांकनं मिळाली आहेत. या व्यतिरिक्त अनेक चित्रपटांतही अंजली जोगळेकरने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्रिज्या, गॅट मॅट या सिनेमामधूनही ती झळकलीये.

तर एका बँकेच्या जाहिरातीत अंजलीला चक्क भारतरत्न मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.सध्या अंजली देव माणूस या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. वेळोवेळी शूटिंगच्या मधल्या वेळेतील बिहाइंड द सीन्स मधील गमती जमती त्या फोटोजच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करत असतातच.

तसेच मध्ये मध्ये इतर कलाकारांसोबत त्या विविध प्रसंगामध्ये सहभागी होत असतात. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कला प्रवासाप्रमाणेच या पुढच्या काळातही त्यांच्या विविध कंगोरे असलेल्या नाविन्यपूर्ण भूमिका, विविध प्रसार माध्यमांतून आपल्याला भेटीस येत राहतील हे नक्की आहेच. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी च्या त्यांना आम्हा सर्व रसिक चाहत्यांकडून खूप खूप शुभेच्छा!!!