मित्रांनो!, छोट्या पडद्यावरील रसिक प्रेक्षकांचा सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’… आजवर चालत आलेल्या प्रथेनुसार हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर त्याच्या पावलांवर पाऊल टाकत लगेचच मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. मराठी बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मराठी रसिक प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं.

अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या या ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसार माध्यमातून आणि चॅनलवरही ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या शो चे चाहते जबरदस्त खुश झाले आहेत.

नेहमीप्रमाणेच यंदाच्या या ‘बिग बॉस- ३’ मराठी मध्ये आता कोणते नवनवीन स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांसह अनेकांना उत्सुकता असतेच. यातच आता या शो मध्ये स्पर्धक म्हणून अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठक बाई आणि ‘का रे दुरावा’ या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक हे दोघेजण झळकणार आहेत.

मित्रानो!, जसे की आपण सर्वजण जाणतोच की अक्षया देवधर आणि सुयश टिळक या दोघांचे अफेअर अनेक दिवसांपासून सुरू होते. मात्र या दोघांनी कधीच प्रसार माध्यमातून आपल्या या नात्याविषयी कबुली दिलेली नव्हती. मात्र त्यांच्या अफेअरची प्रचंड चर्चा झाली होती. पण त्यानंतर त्यांचे ब्रेकअप देखील झाले होते.

एवढेच काय तर दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना अनफॉलोही केले होते. त्यांचे ब्रेकअप सुद्धा सोशल मीडियावर बरेच दिवस ट्रेंडिंगला होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या ब्रेकअप नंतर त्यांचा चाहता वर्ग नाराज होता. त्यांच्या चाहत्यांच्या मते हे कपल एकमेकांसाठीच बनलेले आहे.

दरम्यान हे सुप्रसिद्ध कपल पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहते मात्र प्रचंड आनंदी झालेले आहेत. तसेच आता यंदाच्या या तिसऱ्या पर्वात आणखी कोणकोणते नवीन स्पर्धक सहभागी होणार? बिग बॉस-३ चे नवे घर कसे असेल? घरात नेमके कोणकोणते टास्क रंगणार? आणि मुख्य म्हणजे यंदाच्या पर्वात नवीन असे नेमकं काय होणार? असे बरेच प्रश्न मराठी रसिक प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र आता जसजसे दिवस जातील तसतशी हळू हळू याची माहिती प्रेक्षकांसमोर येणार यात शंकाच नाही.