Comedychi Bullet Train In Ritesh Deshmukh & Vivek Oberoi Special

624

महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम Comedychi Bullet Train कॉमेडीची बुलेट ट्रेन ज्यामधील खुसखुशीत, बेधडकबिनधास्तअतरंगी विनोद्शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसण्यास भाग पाडले. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत.कॉमेडीची बुलेट ट्रेन च्या मंचावर येत्या आठवड्यात आले आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके अभिनेते Vivek Oberoi विवेक ऑबोरॉय आणि Ritesh Deshmukh रितेश देशमुख. हे दोघेही आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी कॉमेडीची बुलेट ट्रेन च्या मंचावर आले. कॉमेडीच्या मंचावर प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे विवेक ऑबोरॉय आणि रितेश देशमुख यांच्या विनोदाची जुगलबंदी. तेंव्हा बघायला विसरू नका हा खास भाग १५ आणि १६ जून रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

 Comedychi Bullet Train कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या मंचावर हे दोघे पहिल्यांदाच आले. या वेळेस त्यांनी कार्यक्रमातील विनोदवीरांबरोबर बरीच धम्माल मस्ती केली. रितेशने स्कीटच्या दरम्यान प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना आदर्श नवरा बनण्याचे धडे दिले. तसेच विवेक ऑबोरॉय स्कीटला एका वेगळ्याच पद्धतीने टिपण्या करताना दिसलाम्हणजे स्कीट संपल्यावर त्याने नादखुळागणपतीपुळाआईच्या गावात बाराच्या भावात आणि लढबापू या शब्दांमध्ये कॉमेन्ट दिल्या. विनोदवीरांनी सादर केलेले स्कीटस देखील त्यांना खूपच आवडली. नम्रता आवटेरोहित पवार आणि योगेश शिरसाट यांनी सादर केलेले स्कीट त्यांना विशेष आवडले. विवेकने तर नम्रता आणि रोहितचे स्कीट बघून मला चार्ली चाप्लीन आठवला असे म्हंटले. 

 कॉमेडीच्या सेटवरील हास्यपरी सोनाली कुलकर्णीचे दुसरे नावदेखील यावेळेस कळाले. विवेक ऑबोरॉय आणि सोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni ह्यांनी एक चित्रपट एकत्र केले होतेत्या दरम्यान तो सोनालीला “वाकड” अस म्हणायचा. कारण सोनाली पुण्यामधील वाकड येथील असल्याकारणाने तिला हे नाव त्याने दिले. या व्यतिरिक्त दोघांनी आपण करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दलची माहिती देखील त्यांनी दिली.

 तेंव्हा बघायला विसरू नका “कॉमेडीची बुलेट ट्रेन”चा विवेक ऑबोरॉय आणि रितेश देशमुख विशेष भाग १५ आणि १६ जून रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.