Pooja Sawant In New Marathi Movie ‘Lapachhapi’

3302

Pooja Sawant Upcoming Marathi Movie ‘Lapachhapi’

पूजाच्या प्रेग्नंसीचे गुपित उलगडले

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅम अभिनेत्री Pooja Sawant पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची बातमी वा-यासारखी पसरली, आणि पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. सोशल नेट्वर्किंग साईटवर पब्लिश झालेल्या पूजाच्या ८ महिन्याच्या बेबी बंप फोटोजमुळे चर्चेला सुरुवात झाली होती. पण, आता याला पूर्णविराम मिळाला असून, आगामी ‘Lapachhapi’ ‘लपाछपी’ या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा तिचा हा नवा लुक असल्याचे समोर आले आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स  प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित ‘Lapachhapi’ ‘लपाछपी’ हा सिनेमा येत्या  १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘Lapachhapi’ ‘लपाछपी’ या सिनेमाची अंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी  या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने बाजी मारली आहे. तसेच हडसन,ओहायो येथील इंटरनेशनल हॉरर हॉटेलचा पुरस्कार देखील ‘Lapachhapi’  ‘लपाछपी’ या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. शिवाय  २०१६ साली माद्रिद येथे झालेल्या माद्रिद इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला पाच नामांकने देण्यात आली होती. ज्यात पूजाची  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. तसेच लंडन येथे लवकरच होत असलेल्या  लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये देखील हा सिनेमा दाखवला जाणार आहे.