ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

पोराच्या बोटाला ठेच जरी लागली, तरी आईच्या काळजाचं रगत व्हतं! असा धीरगंभीर मायेचा संवाद ज्या अभिनेत्रीने पडद्यावर बोलून छाप पाडली आज त्या मराठी इंडस्ट्रीच्या दिदीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दीदी नेमकी कोण ? लता दीदी की अजून दुसरी. पण लता दीदी या सुप्रसिद्ध गायक आहेत. आणि आज आपण सुप्रसिद्ध अश्या अभिनेत्री ला दीदी म्हंटलोय. ती कोण ? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर खालील माहितीत आहे..

काहींच्या कारकिर्दीत इतक्या गोष्टी घडून इतिहास घडलेला असतो की त्या आपल्याला कधी कधी शब्दांत व्यक्त करता येत नाही. म्हणजे शब्द सुद्धा कमी पडू लागतात. त्यांच्या कामाची प्रास्तविकता मांडण्यासाठी.

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ३० जुलै १९२८ ला बेळगावात एक मुलगी जन्मली. कुणालाही वाटलं नसेल की पूढे ती इतकी मोठी अभिनेत्री बनेल. त्या मुलीचं नाव होतं सुलोचना लाटकर. लहानपणी आपल्या कलेला वाव देत मार्ग काढत त्यांनी अभिनय क्षेत्रात करियर ला सुरुवात केली.

FB 1919 – Sulochana ji .. who has played my Mother in innumerable films .. my greetings to her on her birthday were done…

Posted by Amitabh Bachchan on Saturday, 17 February 2018

सुलोचना हळूहळू आपल्या कामाची शोभा वाढवत गेली आणि इंडस्ट्रीची आवडती दीदी बनली. सर्वजण प्रेमानं तिला दिदीच म्हणतात. सुलोचना हे नाव तिला जेष्ठ दिवंगत दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दिलं. त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सुलोचना बाप बनून आधार दिला. त्यांचे वडील हे फौजदार होते.

घरी व नातेवाईक यांच्यामध्ये कुणीही या क्षेत्राशी निगडीत नव्हतं. पण वडिलांच्या एका मित्राच्या आग्रहाने त्यांना चित्रपट करण्याची संधी मिळाली. निरागस, देखणं रुपडं पडद्यावर आलं. जेव्हा तिनं या क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा ती खूप लहान होती. तिनं महारथी, वाल्मिकी, अश्या मराठी चित्रपटामधुन बाल कलाकाराची भूमिका केली.

एखाद्या गोष्टीची ओढ माणसाला त्या कामात गुंतवणू टाकते. सुलोचना दिदीने लहानपणी या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि काम करता करता अनेक गोष्टी त्या शिकत गेल्या. निरीक्षण शक्ती ही त्यांच्याकडे खूप होती. पण त्यांच्या खरी कारकीर्द सुरू झाली ती १९४३ मध्ये कोल्हापुरात.

कारण त्या काळी कोल्हापूर हे या क्षेत्राचं मुख्य ठिकाण होतं जसं आता मुंबई आहे. त्यामुळे त्यांना बेळगाव वरून कोल्हापूर मध्ये यावं लागलं. सुरुवात प्रफुल्ल स्टुडिओ मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी जयप्रभा मध्ये काही काळ पगारी नोकरी ही केली. अश्यातच त्यांची आणि भालजी पेंढारकर यांची ओळख झाली.

हीच ओळख बाप मुलीच्या नात्यात बदलली. त्यांच्याकडुन सुलोचना दिदीला अभिनयाचं हळूहळू सगळं प्रशिक्षण मिळायला लागलं. भालजी पेंढारकर कडूनच ती खरं खूप काही शिकली. त्यांचा सहवास लाभनं तिच्यासाठी नशीबच होतं. तिने त्यांना गुरूस्थानी मानलं.

सुलोचना दिदीच चेहरा हा खूप निरागस, प्रेमळ, वात्सल्य, आणि करुणा दाखवणारा होता. त्यामुळे त्यांच्या अनेक चित्रपटातल्या भूमिके मध्ये त्यांनी नात्यातल्या अनेक भूमिका केल्या. कधी आई, कधी बहीण तर कधी अजून वेगळी.

मीठ भाकर, वहिनीच्या बांगड्या, सारखे त्यांनी खूप सुपरहिट चित्रपट दिले. पुढे त्यांनी हिंदीतही काम केलं. हिंदीतल्या अनेक बड्या स्टारच्या कलाकारांसोबत त्यांनी खूप काम केली. त्यांनी एकूण सत्तर वर्षांच्या काळात मराठी हिंदी मिळून जवळपास 300 चित्रपट केले. त्यामुळे त्या घराघरात पोहचल्या. अनेक चित्रपटासाठी त्यांना अभिनयाचे अनेक मानाचे पारितोषिके मिळलेले आहेत. त्यांनी पौराणिक, भक्तिमय, आणि इतर सर्व प्रकारच्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

सुलोचना याना कांचन लाटकर ही एक मुलगी होती. लग्नानंतर काही वर्षांतच वारला. त्यामुळे मुलीचं लहानपणी सगळं त्यांनीच बघितलं. पुढे मोठेपणी काशिनाथ घाणेकर या सुपरस्टार मराठी अभिनेत्याशी तिचं लग्न लावुन दिलं. सुलोचना ताई यांना अमिताभ बच्चन आई मानतात. पडद्यावर ही आणि पडद्यामागे सुद्धा. खरचं सुलोचना दिदींचा प्रवास खूप खडतर पण कधीही न संपणारा आहे.