हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आज चांगल्या पद्धतीने आपलं करियल घडवत असताना आपल्याला पहायला मिळतं आहेत. पण एक काळ असा असायचा की, हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे त्याच्याशी निगडीत नसलेल्या नव्या बाह्यकलाकारांना त्यात काम करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत असायची. सहजासहजी तर हे क्षेत्र आधी सर्वसामान्यांसाठी नाहीच हाच विचार प्रथमदर्शनी सर्वांच्या ओठांवर असायचा.
ती झगमगाटातली दुनिया, ती रौनक, तो अमाप पैसा, हे सारं एखाद्या सर्वसामान्याला मिळवणं जमेल का? असे अनेक नानाविध प्रश्न आणि सोबतच अनेकांवर जबाबदारीचे इतर संकट असायचे. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीतून जाऊन जेव्हा एक मराठी मुलगी बॉलीवुडमधे आपलं स्थान निर्माण करते, स्वत:ची एक चांगली छाप उमटवून सोडते, टॉपच्या अभिनेत्रींमधे तिच्या नावाचाही उल्लेख केला जातो, तेव्हा आपसूकच आपल्याला त्या व्यक्तीमत्वाचा हेवा वाटतो.
तर मुळात तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल, नेमकी कोण आहे ही अभिनेत्री? तर ही अभिनेत्री इतर कोणी नसून मुग्धा गोडसे ही आहे. मुग्धाचा बॉलीवुडमधला प्रवास तितकासा सहज साधा नव्हताचं, तरी तिने जिद्दीच्या जोरावर जग आपल्या मुठीत साठवलं.
मुग्धाच्या घरची परिस्थिती फार बेताची असल्याने तिला सुरूवातीला तिची गुजरण चालवायला ३०० रूपये घरून महिन्याला मिळत असायचे; त्यात आपलं काही भागत नाही आणि घरच्यांचीही ओढाताण होतेयं, हे समजलेली मुग्धा नंतर स्वत:च काम करून सर्व गोष्टी हाताळू लागली. एका पेट्रोल पंपावर काम करून महिन्याला 1000 रूपये कमवून त्यातून ती घरच्यांना पैसा पुरवू लागली.
मुग्धा काम करत असताना तिचे सिनेसृष्टीत येण्याचे प्रयत्न तिने चालूच ठेवले होते. 2002 सालात मुग्धाने मेगा मॉडेल हंट ही स्पर्धा जिंकली. इथून पुढे तिच्या मॉडेलिंग करियरला खरी गती मिळायली सुरूवात झाली. 2004 या सालात तिने मिस इंडिया ची सेमी फायनलदेखील गाठली होती. त्यानंतर तिच्या वाट्याला दोन अल्बम सॉंगची ऑफर आली, तिने आनंदाने ती स्विकारत पुर्ण केली. तिच्या त्याच कामाने पुढे तिला फॅशन हा हिंदी सिनेमा मिळाला.
2008 सालात तिचं सिनेमा पदार्पण झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतरपासून मध्यंतरी आजपर्यंत तिने अनेक चांगल्या सिनेमांमधून स्वत:च्या भुमिकांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मुग्धा तशी मुळात पुण्यातली. तिचं शालेय शिक्षण सारकाही पुण्यातच पार पडलं. मुग्धाने अभिनेता राहूल देव याच्यासोबतच्या तिच्या रिलेशनशीपबाबत मध्यंतरीच खुलासा केला.
यावेळी मुग्धा आणि अभिनेता राहूल देव दोघेही प्रचंड चर्चेचा विषय बनून राहिले होते. मुग्धाने केवळ हिंदी सिनेसृष्टीतच काम केलं असं नाही, तिने मागे एक मराठी सिनेमादेखील केला होता. मुग्धाने आज तिच्या हिमतीवर आणि तिच्या जिद्दीवर एक स्थान सिनेसृष्टीच्या जगात निर्माण केल्याच पहायला मिळतं आहे. “मराठी पाऊल पडते पुढे” या मराठी कार्यक्रमात ती जज म्हणूनदेखील वावरताना पहायला मिळाली होती.
मुग्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरीच सक्रीय असल्याची अनेकदा पहायला मिळते. तिचा पार्टनर असलेला अभिनेता राहूल देव याच्यासोबतच्या अनेक फोटोंनाही ती तिथे आपल्या चाहत्यावर्गाशी शेअर करत असते. मुग्धा अभिनेता राहूल देव याच्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान असली तरीदेखील तिने आता राहूल देव याच्यासोबतच्या तिच्या नात्याला योग्यरित्या स्विकारल्याचंही तिचं म्हणणं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!