मराठी टीव्ही मालिकांमधून हा अभिनेता आपल्या भेटीला आजवर आला, त्यानंतर त्याने सिनेमातून दर्जेदार कामदेखील केलं. आज त्याच काम आपल्या ह्रदयावर कायम आठवणीत राहील असचं आहे, अर्थात मुळशी पॅटर्नसारख्या सिनेमात “राहुल्या” या प्रमुख पात्राच्या मित्राची भन्नाट भुमिका बजावणाऱ्या क्षितीश दाते यानं आता एक जबरदस्त गोष्ट केल्याची पहायला मिळते आहे.

बन मस्का, जिंदगी विराट, गोंद्या आला रे अशा विविध प्रकारच्या प्रोजेक्टमधून तो आजवर रसिकप्रेक्षकांसमोर आला परंतु मुळात मुळशी पॅटर्नमधल्या त्याच्या भुमिकेने त्याला अगदी ठाम अशी ओळख दिली हे तितकचं खरं आहे. तर आता मुळात मुद्दा असायं की या पठ्ठ्याने नेमकं केलयं तरी काय? चला तर मग आता आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

क्षितीशने नुकतचं त्याच लग्न उरकल्याची गोष्ट समजली आहे. अर्थात त्याचा साखरपुडा काहीसा असाच अचानक झाला होता. अभिनेत्री रूचा आपटे हिच्यासोबत गुपचूप साखरपुडा उरकणाऱ्या क्षितीशने आता अगदी गुपचुपरित्याच तिच्याशी लग्नगाठदेखील बांधली असल्याची पहायला मिळते आहे.

मुळात लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करत ही सुखद बातमी देऊन एकप्रकारे सर्वांनाच सरप्राईज केलं असं म्हणता येईल. सुरूवातीला तर ज्यावेळी या दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी होऊन गेलेल्या साखरपुड्याचे तब्बल एक वर्षांनंतर दोघांनी फोटो शेअर करत त्याचा खुलासा केला होता. अर्थात साखरपुडा तर फारच गुपचुपरित्याच झाला परंतु लग्न, तेदेखील अगदीच गुपचुपरित्या पार पडलं.

तुझ्यात जीव रंगला, साथ दे तू मला, दिल दोस्ती दुनियादारी यांसारख्या मालिकांमधून रूचा आपटे आजवर रसिकप्रेक्षकांसमोर भेटीला आली. तिला तिच्या प्रत्येक भुमिकेने नवा चाहतावर्ग मिळवून दिला. तिच्या भुमिकांमधून तिने चांगलीच छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटवली. अभिनेता क्षितीश दाते याच्यासोबत लग्न झाल्यानंतर रूचा व क्षितीश यांच्या लग्नाचे काही फोटो त्यांच्या मित्रमैत्रिणींनी शेअर केल्यामुळे खरतरं दोघांच लग्न झाल्याची बाब प्रकाशझोतात आली.

अन्यथा कदाचित दोघांनी हे लग्नही काही काळ एक गुपितचं ठेवलं असतं की काय! असं वाटतं. मुळात सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी क्षितीश आणि रूचा दोघेही एकत्र नाटकात काम करत असायचे, त्याचकाळात त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री जुळली असेल, पुढे चालून दोघे एका क्षेत्रात आज स्वत:च्या पायावर ठामपणे उभे आहेत म्हटल्यावर एकत्र येत संसार थाटण्याचा हा निर्णय घेण्यात आला असेल. क्षितिज आणि रूचा दोघे पुण्यातलेच आहेत.

या जोडीने बनमस्का मालिकेतही एकत्रच काम केल्याच पहायला मिळालं होतं. रूचाने आजवर तिच्या कामाची पोचपावती चांगल्याच प्रकारे दिली आहे, “अस्स माहेर नको गं बाई” या मालिकेमधील तिच्या भुमिकेनेही प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

परंतु सध्याच्या घडीला सर्वांना थोडीशी आश्चर्यात टाकणारी बाब म्हणजे, क्षितिश व रूचा दोघांनी साखरपुडा आणि लग्न या दोन्ही गोष्टी अगदीच गुपचुपरित्या केल्या. अनेकांना हे थोडसं वेगळं वाटणं साहजिकचं आहे. सध्या अनेक चाहते, प्रेक्षकवर्ग आणि इतर सेलीब्रेटीजदेखील दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देत असल्याचं पहायला मिळतं आहे. तर आपणही त्यांना चांगल्या आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!