हिंदी सिनेमातील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हटलं तर अभिनेते मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्तींनी आजवर अनेक चित्रपटांमधून आजवर रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाबरोबरच नृत्यकलेत निपुण असलेले मिथुन चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून मिडियात चर्चेचा विषय बनून राहिले आहेत.
याचं कारण म्हणजे ते आता नव्याने त्यांची राजकीय इनिंग सुरू करत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मिथुनदांचा विषय संपुर्ण भारतभर चर्चेत येताना पहायला मिळतो आहे. 7 मार्च रोजी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे मिथुनदांनी प्रवेश केला. आणि त्यानंतर झालेल्या त्यांच्या पहिल्याच भाषणाने देशभरात खळबळ निर्माण केली. पुढे चालून मिथुनदांच हे राजकिय करियर कशा पद्धतीचं स्वरूप धारण करेल हे पाहणं थोडसं रंजकच ठरणार आहे.
मिथुन चक्रवर्तींनी राजकिय क्षेत्रात काहीतरी करण्याची हि पहिली वेळ नाही, याआधी ते राज्यसभेवर टीएमसी या पक्षाकडून सासंद राहिले आहेत. मिथुनदा यांचे अनेक विविध विषय सध्या चर्चेत आलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे किती आहे? तर तुम्हाला माहिती होण्यासाठी सांगायचं म्हणजे तब्बल 258 कोटी रुपयांची त्यांची एकूणएक संपूर्ण संपत्ती आहे.
मिथुन चक्रवर्तींनी अनेक मोठ्या शहरात स्वत:च्या नावावर काही हॉटेल्सदेखील घेऊन ठेवलेली आहेत ज्यामधून ते सिनेक्षेत्रातून बाहेर पडले असतानाही नफा कमवू शकतात. आणखी माहितीसाठी एक खास बात म्हणजे, मिथुन चक्रवर्तींची मालकी ही “मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स” यामधेदेखील आहे.
तमीळनाडूमधील उटी या ठिकाणी मिथुनदांच फाईव्ह स्टार हॉटेल आहे. म्हैसूर आणि अजूनही इतर दाक्षिणात्य भारताच्या काही भागात मिथुनदांचे हॉटेल्स आहेत. या लग्जरी हॉटेल्सखेरीज म्हणालं तर मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा आलीशान राहण्याचा बंगलादेखील आहे. मिथुन यांच्या उटीच्या हॉटेलच्या सौंदर्याची बातचं काहीशी न्यारी आहे.
59 खोल्या, हेल्थ फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल यांसारख्या अजुन इतर सुविधा इथे उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या साथीने मिथुन दा या हॉटेल्सचा बिझनेस सांभाळत असतात. मिथुन चक्रवर्ती यांच्या मोनार्क सफारी पार्कमधे तब्बल 16 बंगले, 14 ट्विन्स साधी घरे, रेस्टॉरंट, चिल्ड्रन प्ले ग्राउंड, हॉर्स राइडिंग यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध असल्याच्या पहायला मिळतात.
उटीमधील प्रत्येक गोष्ट मिथुन चक्रवर्तींच्या ह्रदयाच्या जवळची आहे. त्यांच्या अनेक सिनेमांच्या शुटींगदेखील इथेच पार पडलेल्या आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर होऊन मिथुन दा अनेकदा इथेच सहसा आराम करत असल्याचे पहायला मिळतात. मुंबईतल्या आपल्या दोन आलीशान बंगल्यांना सोडून मिथुन दा उटीत राहणं पसंत करतात, याचा अर्थ उटी साहजिकचं तितकं खास आहे.
मिथुन चक्रवर्तींना कुत्र्यांची प्रचंड आवड आहे. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल परंतु त्यांच्याकडे एकूणचं 76 कुत्र्यांच कलेक्शन आजवर केलेलं पहायला मिळेल. मिथुनदाच्या करीयरची सुरूवात ही 1976 सालापासून झाली होती आणि पहिल्याच सिनेमाकरता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मिथुनदांच करियर अगदी उंचीवर आणि कायम प्रकाशझोतात राहणारं ठरलं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!