तुम्हाला “बजरंगी भाईजान” हा सिनेमा हमखास लक्षात असेलच. या सिनेमाने एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर मांडून रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाम घेतला होता. त्यातही खास विशेष बाब म्हणजे, “मुन्नी” या पात्राची भुमिका साकारणाऱ्या छोट्या मुलीने तर विना तोंडाने एक शब्द बोलता केवळ चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर अभिनय तारून नेला होता.

अर्थात तिच्या भुमिकेची तीच गरज होती. तरिदेखील सोपी नसणारी ही भुमिका तिने साकारत रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. बॉलिवूडमधे आजवर सलमान खान कित्येक वर्षांपासून राज्य करतो आहे. आणि त्याच्या आजवरच्या आख्यायितेत चांगल्या सिनेमांची जर लिस्ट काढायची ठरवली तर त्यात निश्चितच निर्विवादपणे बजरंगी भाईजान हे नाव असणारचं आहे.

सलमानच्या एकापेक्षा एक भन्नाट हिट सिनेमांपैकी हादेखील एक सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. विशेष बाब म्हणजे, “बजरंगी भाईजान” या सिनेमाने बाहूबलीसारख्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तगडी टक्करही दिली होती. 2015 साली आलेल्या बजरंगी भाईजान या सिनेमाने दोन देशांमधील आपआपसातल्या दुश्मनीमुळे घडणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीरेखेची काय विटंबना होऊ शकते, याच विदारक वर्णव केल्या गेलं होतं.

मुळात या सिनेमात करिना कपूर, नवाजुद्दिन सिद्दीकी यांसारख्या कलाकारांच्या भुमिका होत्या. नवाजुद्दिन एक विनोदी पत्रकार दाखवण्यात आला होता. तर करिना कपूर सलमानच्या ओपोझीट काम करत असल्याची पहायला मिळते. यात मुन्नी ही भुमिका जी मुलगी पाकिस्तानातून चुकून भारतात आली आहे, ती थेट सलमानला भेटते जो की एक हनुमानाचा निस्सिम भक्त असतो. पुढे हा सिनेमा फारच सुंदररित्या वळण घेत शेवटाकडे येतो. आता यात मुन्नीची भुमिका साकारली आहे ती म्हणजे, हर्षाली मल्होत्रा हिने.

त्यावेळी सिनेमात अगदी निरागस, गोंडस दाखवलेली हिच मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा आता अगदीच बदलून गेल्याची पहायला मिळते. लहान मुन्नी असतानाही खऱ्या आयुष्यातदेखील ती तेवढीच निरागस दिसत असायची आता मात्र तिच्या चेहऱ्यावर जणू ग्लॅमरस रंगाचा साज चढला आहे.

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असलेली हल्ली पहायला मिळते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक फोटो, व्हिडिओ व इतर गोष्टीदेखील शेअर करत असते. नाही म्हटलं तरी गेल्या 5-6 वर्षात खुप गोष्टी बदलल्या आहेत, त्याचसोबत हर्षालीचं सौंदर्यही अधिक प्रभावीपणे खुललेलं पहायला मिळतं आहे. आपल्याला मिळालेल्या लोकप्रियतेच्या जोरावर हर्षाली आज एक चांगल्या उंचीवर पोहोचली आहे.

ती नेहमीच तिच्या शेअर केलेल्या फोटोंना अनेक हटके पद्धतीने कॅप्शन देतं चाहत्यांच लक्ष तिच्याकडे खेचून घेते. हर्षालीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजची मुन्नी आणि बजरंगी भाईजानमधील मुन्नी या दोन्हीत जमीन-आस्मानचा फरक पडलेला पहायला मिळतो. बऱ्याच अवधीनंतर हर्षाली पुन्हा प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी जेव्हा बजरंगी भाईजान सिनेमाला 5 वर्ष पुर्ण झाली होती.

तेव्हा तिने एक व्हिडिओ शेअर करत सिनेमाच्या आठवणी ताज्या करत त्या रसिकप्रेक्षकांसोबत शेअर केल्या होत्या. तिने सोबतचं हेदेखील नमूद केलं होतं की, 5 वर्षांनंतरही आज जपानसारख्या देशात काही थिअटर्समधे हा सिनेमा चालू आहे, याचं विशेष कौतुक वाटतं. रसिकांनी सिनेमाला दिलेल्या प्रेमाकरता त्यांच्या सर्वांचे आभार. आणि या पोस्टवेळी चर्चेत आलेली हर्षाली आता रोज सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!