सध्याच्या घडीला बॉलीवुड असो टॉलीवुड असो वा इतर कोणतंही सिनेसृष्टीचं क्षेत्र असो, मनोरंजनाच्या प्रत्येक ठिकाणी पैसा चांगल्या पद्धतीने खिळल्या गेला आहे. आणि या कारणास्तव अनेक कलाकार अभिनेते-अभिनेत्र्या हे चांगला अमाप पैसा कमावताना पहायला मिळतात. अर्थात जितका पैसा ते कमावतात तेवढ्या प्रमाणात ते खर्चदेखील करत असल्याचं पहायला मिळतं. सर्वप्रथम पहायचं म्हटलं तर व्हॅनिटी गाड्यांबद्दल तुम्हाला माहिती असेलचं.

अनेक व्हॅनिटी गाड्या या प्रचंड महाग असतात. आणि सिनेकलाकार त्या घेणं अफोर्डही करू शकतात. चला तर मग आपण पाहुयात कोण आहेत असे कलाकार ज्यांनी अगदी भरगच्च पैसा खर्च करत व्हॅनिटी गाड्या खरेदी केल्या आहेत. सर्वप्रथम दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून यापासून सुरूवात करूयात. स्टाईल आणि ॲक्शनला सर्वांना तोड देणाऱ्या अल्लू अर्जुनकडे तब्बल स्वत:ची 7 करोड रूपयांची व्हॅनिटी कार आहे. रेड्डी कस्टम्स यांच्याकडून ही कार डिझाईन केल्या गेली आहे. अल्लू अर्जूनच्या गरजांनुसार ही गाडी डिझाईन केल्या गेली आहे.

अल्लू अर्जून यांच्यानंतर येतो तो म्हणजे, बॉलिवूडचा किंग खान शाहरूख. अर्थातचं शाहरूखचं घर मन्नत जितक्या दिमाखात रूबाबदारपणे उभं आहे तितक्याच शानोशौकतिची त्याची व्हॅनिटीदेखील असल्याची पहायला मिळते. “वोल्व्हो बी आर 9” या मॉडेलची त्याच्या व्हॅनिटीची किंमत तब्बल 5 कोटींच्या आसपास आहे. ही व्हॅनिटी 14 मिटर लांबीची असून हिला दिलीप छाबडिया यांच्याकडून डिझाईन केल्या गेलं आहे. या व्हॅनिटीमधे नानाविध प्रकारच्या सुविधा आपल्याला पहायला मिळतात.

शाहरुखनंतर बोलायचं झालं तर बॉलिवुडचा भाईजान अर्थात सलमान खान. सलमानच्या व्हॅनिटीलादेखील दिलीप छाबडिया यांच्याकडूनचं डिझाईन केल्या गेलं आहे. सलमानच्या व्हॅनिटीत थेट घरातील खोल्यांप्रमाणे दोन खोल्या आहेत. वाशरूम व इतर सोयीदेखील यात पुरवण्यात आल्याची माहिती आहे. भाईजानच्या या व्हॅनिटीची किंमत 4 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

खऱ्या अर्थानं आज जगभरात विविध प्रकारच्या व्हॅनिटींची निर्मिती होत असल्याची आपल्याला पहायला मिळत आहे. “इलेमेंट पलाझो” या जगभरातल्या सध्याच्या सर्वाधिक महागड्या व्हॅनिटीची निर्मिती ऑस्ट्रेलियाच्या “मार्ची मोबाईल” या कंपनीने केली आहे. 40 फुट लांबीच्या असलेल्या या व्हॅनिटीची किंमत जवळपास नाही म्हणता 18 कोटींच्या घरात जाते. आता आपण बोलुयात बॉलीवुडमधील संजय दत्त या अभिनेत्याबदद्दल. संजय दत्त याच्याकडेही एक चांगल्या सोयिसुविधांची व्हॅनिटी असल्याची पहायला मिळते. “व्हॅन ए एक्स एल” नावाची तब्बल 3.15 कोटींची व्हॅनिटी संजय दत्त वापरतो. “द एयरफोर्स 1” यापासून प्रेरित होऊन या व्हॅनिटीची निर्मिती केल्या गेली होती.

तुम्हाला तर माहितच आहे की, सिंघम अर्थात अजय देवगण हा गाड्यांचा किती मोठ्या प्रमाणात शौकीन आहे. त्याच्याकडे तब्बल 3 कोटींची एक लक्झरीयस व्हॅनिटी असल्याची पहायला मिळते. अजय देवगण त्याच्या व्हॅनिटिला प्रचंड जपतो, तो प्रत्येक शुटच्या ठिकाणी हमखास न विसरता त्याची व्हॅनिटी घेऊन जात असल्याच आजवर आढळून आलं आहे.

बॉलीवुडमधे अनेक सिनेअभिनेत्यांना टक्कर देणारी अभिनेत्री म्हणजे दिपीका पादुकोन. दिपिकाकडेदेखील स्वत:ची चांगली व्हॅनिटी आहे. 2 कोटींपेक्षा अधिक किंमच असलेल्या व्हॅनिटीची दिपिका मालकिन आहे. दिपिकाची व्हॅनिटी जवळपास तीन भागांमधे विभागल्या गेली आहे. यामधे प्रायव्हेट झोन, सिटींग एरिया सोबतच स्टाफ एरियादेखील आहे. यात पेंट्रीची सेपरेट व्यवस्थादेखील केली आहे.

यानंतर येतो तो अभिनेता म्हणजे बॉलीवुडमधील खिलाडी असलेला अक्षय कुमार. अक्षय कुमार त्याच्या एकूण शेड्युलबाबत किती काटेकोर आहे, हे सर्वांना माहितच आहे. त्याच्या या गोष्टींचा विचार करूनच त्याची व्हॅनिटी बनलेली पहायला मिळते. 2.9 कोटींची असलेली अक्षयची व्हॅनिटी जवळपास 14 मिटर लांबीची आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!