४ सप्टेंबर १९५२ साली जन्मलेल्या अभिनेता ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या आयुष्यात खूप रंजक किस्से घडले जे आजही, बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात. मीना अय्यर लिखित आणि हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित केलेल्या ‘खुल्लम खुल्ला : ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या आत्मचरित्रात त्यांनी यापैकी काहींचा उल्लेख केला आहे.

ऋषी कपूर हे खूप स्मो-किं-ग करत असत, परंतु एकदा मुलगी रिद्धिमा बोलल्या नंतर त्यांनी ते कायमचे सोडले. त्यांनी लिहिलेय , “मी खूप धू-म्र-पा-न करायचो, परंतु जेव्हा माझी मुलगी म्हणाली की तुमच्या तोंडाला सि’गा’रे’ट’चा वा’स येत असल्याने मी तुला सकाळी गुडमॉर्निंग किस करणार नाही.” आपल्या लाडक्या लेकीचं बोल ऐकल्यावर त्याक्षणी मी स्मो’किं’ग सोडले.

दुसरा किस्सा टीना मुनीमचा. ऋषी कपूर लिहितात “टीना मुनिमने पडद्यावर एक वेगळंच आकर्षण निर्माण केलं होतं. तिच्यासारख्या मॉडर्न को-स्टारबरोबर मी कधीही काम केलेले नव्हते. ‘कर्ज’ फिल्म मधे आम्ही एकत्र काम केले जे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. आमची मैत्री आणि चित्रपटांमुळे आमच्या अफेअर च्या अ’फ’वा पसरल्या.

तेव्हा माझे लग्न नितु सिंग सोबत झाले नव्हते आणि टीनाचे अफेअर संजय दत्त सोबत होते. जेव्हा संजूने आमच्या अफेअरची बातमी ऐकली तेव्हा एक दिवस तो ड्रग्स च्या न’शे’त गुलशन ग्रोव्हरसोबत माझी होणारी बायको नितू सिंगशी भां-डा-य-ला तिच्या पालीच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला, पण नीतूने ही परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली.

तिने शांतपणे संजूला समजावून सांगितले की त्या गोष्टी फक्त अ-फ-वा आहेत. नीतूने त्याला सांगितले- ‘टीना आणि चिंटू यांच्यात असे काही नाही. आपण आपल्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे. आजही मी आणि संजू या गोष्टी आठवत हसत असतो. जेव्हा नीतू आणि मी लग्न केले तेव्हा या लग्नात माझ्या सर्व नायिका हजर होत्या. ”

अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी “102 नॉट आउट” मध्ये एकत्र काम केले. या चित्रपटात अमिताभ ऋषी कपूर चे वडील होते. ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे, की, “बॉबी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यामुळे अमिताभ नि’रा’श झाले होते. हा पुरस्कार निश्चितच ‘जंजीर’साठी त्यांनाच मिळेल असे त्यांना वाटले.

दोन्ही चित्रपट त्याच वर्षी (१९७३) मध्ये रिलीज झाले. मला तो पुरस्कार विकत घेताना लाज वाटली. कारण तारकनाथ गांधी नावाच्या एका पीआरओने मला सांगितले, “सर, तुम्ही मला ३० हजार द्या, मी तुम्हाला हा पुरस्कार मिळवून देईन” मी विचार न करता त्यांना पैसे दिले.

माझे सेक्रेटरी घनश्याम देखील म्हणाले, ” सर तुम्ही पैसे द्या तुम्हाला पुरस्कार मिळेल त्यात काय आहे?” अमिताभ यांना नंतर समजले की मी हा पुरस्कार पैसे देऊन विकत घेतलाय. त्यावेळी मी फक्त २२ वर्षांचा होतो. पैसे कुठे खर्च करायचे, कुठे नाही याची मला फारशी कल्पना नव्हती. नंतर मला माझी चूक लक्षात आली. पण अमिताभ मात्र बराच काळ माझ्यावर नाराज राहिले.

‘डी डे’ चित्रपटात ऋषी कपूर यांनी दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली होती. ‘खुल्लम खुल्ला’ मध्ये अं-ड-र-व-र्ल्ड डॉ-न दाऊद इब्राहिम यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही त्यांनी अनेक मनोरंजक खुलासे केले आहेत. ते लिहितात, “मी माझा जवळचा मित्र बिट्टू आनंदसमवेत दुबईला गेलो होतो. जेथे मी आशा भोसले आणि आरडी बर्मनच्या नाईट शो मधे भाग घेणार होतो. विमान तळावर आला.

त्याने मला फोन लावून दिला आणि म्हणाला- दाऊद साहेब बोलतील. हे सर्व मुंबई बॉ-म्ब-स्फो-टापूर्वी घडले होते. दाऊद फोनवर म्हणाला – काहीही हवे असेल तर मला सांगा. “त्याने मला त्याच्या घरी बोलावले. मला तर धक्काच बसला. थोड्या वेळाने माझी ओळख एका मुलाशी झाली जो इंग्रजांसारखा दिसत होता. तो बाबा होता, दाऊदचा उजवा हात. त्याने मला सांगितले – दाऊद साहेब तुझ्याबरोबर चहा पिऊ इच्छित आहेत.

त्या दिवशी संध्याकाळी बिट्टू आणि मला ते आमच्या हॉटेलमधून चमकत्या रोल्स रॉयसमध्ये घेऊन गेले होते. दाऊदला माझा तवायफ चित्रपट खूप आवडला. कारण त्यात माझे नाव दाऊद होते, असे दाऊदने मला सांगितले. काही वर्षानंतर जेंव्हा दाऊदने दे-श-वि-रो-धी का-र-वा-या केल्या, त्या नंतर मात्र मी त्याला कधीच भेटलो नाही.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.