विवाहासारख्या पवित्र बंधनात मुलाचे आणि मुलीचे यांचे वय नक्कीच पहिले जाते. या प्रकरणात मुले मुलींपेक्षा वयाने मोठे असतात. पण आज बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आहेत जे आपल्या पतींपेक्षा वयाने खूप मोठे आहेत. बॉलीवूड मधील अनेक नामवंत अभिनेत्रींनी आपल्या पेक्षा वयाने लहान असलेला जोडीदार निवडलेला आहे, आणि आपल्या जोडीदारासमवेतचे त्यांचे आयुष्य मोठ्या आनंदामध्ये कंठीत आहेत.

उर्मिला मातोंडकर :- उर्मिला मांतोडकर आणि मोहसिन उर्मिलाने ९ वर्ष लहान मॉडल आणि बिझनेसमन मोहसिन अख्तर मीरसोबत विवाह केला. मोहसिन कश्मीरचा राहणारा आहे. तो जाहिरात आणि मॉडलिंग क्षेत्रात नावाजलेला आहे. २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.

प्रीति ज़िंटा :- प्रिती जिंटा आणि जेन प्रिटी जिंटाने २०१६ मध्ये अमेरिकेच्या जेन गुडइनफसोबत विवाह केला. प्रीति आणि जेन यांच्या वयात १० वर्षाचं अंतर आहे. प्रिती आणि जेन अमेरिकेत भेटले होते. जेन फायनॅंशियल अॅनालिसिस्ट आहे. प्रीतीचा विवाहानंतर अमेरिकेतच राहत आहे.

ऐश्वर्या राय :- ऐश्वर्या आणि अभिषेक ऐश्वर्या रायने हिने देखील वयाचा विचार न करता तिच्या पेक्षा लहान अभिषेक बच्चन सोबत विवाह केला. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा तीन वर्षाने मोठी आहे. बॉलिवूडमधले हे हॅपिली मॅरिड कपल आहे. १० वर्षांपासून ते सोबत राहत आहेत आणि त्यांना एक मुलगी देखील आहे.

प्रियंका चोपड़ा :- अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला आणि तिचे पती निक जोनास यांचा जन्म 16 सप्टेंबर 1992 रोजी झाला. त्यांनी अलीकडे लग्न केले असून, माहितीनुसार प्रियंकापेक्षा निक जोनास हा 10 वर्षांनी लहान आहे.

सोहा अली खान :- सोहा अली खान आणि कुणाल खेमू सोहा आणि कुणालच्या मध्ये ५ वर्षाचा फरक आहे. २००९ मध्ये ढूंढते रह जाओगे सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं आहे मग दोघांनी विवाह केला. सोहा आता लवकरच आई बनणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.