अभिनेता इंदर कुमारचा जन्म २६ ऑगस्ट १९७३ रोजी झाला होता. १९९६ मध्ये ‘मासूम’ चित्रपटाद्वारे त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

यानंतर, इंदर अनेक चित्रपटांमध्ये दिसला परंतु जास्तीत जास्त तो सहायक भूमिकांमध्ये दिसला. अभिनेता इंदर वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी हृ-द-य-वि-काराच्या झ-ट-क्याने नि-ध-न झाले होते. 2017 साली त्यांनी जगाला निरोप दिला घेतला.

इंदर जेव्हा आपल्या तरुण आणि हँडसम चेहऱ्यासोबत बॉलिवूडमध्ये दाखल झाला तेव्हा तो समकालीन कलाकारांशी स्पर्धा करायचा. मात्र, त्याला यश आणि प्रसिद्धी मिळवता आली नाही. चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही कार्यक्रमांमध्येही त्याने काम केले.

इंदिर कुमार प्रसिद्ध टीव्ही शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये मिहीर विराणीच्या मुख्य भूमिकेत दिसला होता. बरीच वर्षे मेहनत करूनही जेव्हा इंदर कुमार सुपरस्टार बनू शकला नाही, तेव्हा निराश झाला आणि या निराशेमध्ये त्याला दा-रूचे व्यसन लागले.

याच दरम्यान, इंदर कुमार यांच्या सोबत एक अ-प-घा-त झाला. त्या अ-प-घा-त-चा त्याच्या कारकिर्दीवर विपरित परिणाम झाला. दिग्दर्शक पार्थो घोष यांच्या ‘मसीहा’ या चित्रपटात इंदर सुनील शेट्टी यांच्यासोबत काम करत होता.

चित्रपटामध्ये एक हेलिकॉप्टर सीन होता. इंदर हेलिकॉप्टरने स्वत: स्टंट करत होता. तेवढ्यात इंदर त्या हेलिकॉप्टरमधून खाली पडला. त्याला गंभीर दु-खा-प-त झाली. डॉक्टरांनी त्याला तीन वर्षे बेड रेस्ट करण्यास सांगितले.

इंदर दु-खा-प-तीमुळे तीन वर्षांपर्यंत चित्रपटांपासून दूर राहिला. यामुळे त्याची कारकीर्द खराब झाली. इंदरने २००४ साली एका मुलाखतीत सांगितले होते की शूटिंग दरम्यान मी एका हेलिकॉप्टरमधून पडलो. डॉक्टरांनी मला तीन वर्षाच्या बेड रेस्ट करायला सांगितले. डॉक्टरांनी म्हटले होते की मी माझ्या पायावर पुन्हा उभा राहू शकेन, याची फारशी आशा नाही.’

इंदर सलमान खानचा जवळचा मित्र होता. त्याने सलमानबरोबर ‘कहीं प्यार ना हो जाए’, ‘तुमको ना भूल पाएंगे’ केले. २००९ मध्ये सलमानने इंदर कुमारला ‘वॉन्टेड’ मध्ये काम दिले होते. ‘वांटेड’ चित्रपटाला जबरदस्त यश मिळालं. जेव्हा इंदर कुमारकडे कोणतेही काम नव्हते, तेव्हा सलमान आपल्या कुटुंबासाठी मशीहा म्हणून आला असे इंदरच्या पत्नीनेही एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.