चित्रपटांमधे किसिंग सिन देणं आजच्या घडीला अर्थात फारसं काही वावगं नसेलही परंतु आजही काही खास गोष्टींकरता किंवा आपली स्वत:शी असलेली कमिटमेंट म्हणून काही सिनेअभिनेत्री चुंबनाचा थोडक्यात किसींग सीन देण्यासही नकार देतात.

अर्थातच बाॅलिवूडच्या बिग मूव्हीज अथवा मोठ्यामोठ्या हिरोईन्स जिथे त्या बिकीनी वा इतर आणखी जरासा बोल्ड सिन थेट देण्यास कुठेच कुचराई करत नाहीत तिथे अशी एक अभिनेत्री येणार आहे जी किसींग सिन्सना पण नकार देते.

अर्थात ही गोष्ट आहे ती म्हणजे, दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश या हिरोईनची. ही हिरोईन नव्याने येणाऱ्या अजय देवगण स्टारर मैदान या चित्रपटातून बाॅलिवूडमधे पहिलं पाऊल टाकत आहे. या अभिनेत्रीने आपल्या कलेच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक स्वत:च वेगळं असं वर्चस्व नक्कीच निर्माण केल म्हणायला हरकत नाही.

तिचे सिनेमे अर्थातच छानशा मांडणीचे आणि तिची सहसा “क्युटनेस ओव्हरलोडेड” म्हणायला हरकत नसलेल्या अधिक भुमिका आजवर पाहिल्या गेल्या आहेत. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे, या सिनेअभिनेत्रीचा स्ट्रिक्टली किसींग सिन्सना थोडक्यात चुंबन दृश्यांना नकार आहे.

चित्रपटांमधील अभिनेत्रींना चुंबन देणारी दृश्ये देणे ही मोठी असेल ; हे जरी मानून चाललं तरी जवळजवळ प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये चुंबन देणारी दृश्ये दिली आहेत, मुळात पाहिल्यावर अद्याप अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चुंबन देखावा आणि पूर्णपणे चुंबन देखावा यासाठी दिग्दर्शकाला आधीच आपली भूमिका सांगतात.

परंतु दक्षिण चित्रपटातील सिनेअभिनेत्री कृती सुरेश तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी बर्‍याच चर्चांमध्ये असून, ती अजय देवगनच्या मैदान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या सर्वांना हे माहितच आहे की, बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की जे नियम तोडत नाहीत जसे सलमान खान कधीही चित्रपटात चुंबन देण्याचे दृश्य देत नाही, त्याचप्रमाणे अक्षय कुमार नियमानुसार, रविवारी तो शूट करत नाही.

थोडक्यात आता म्हणालं तर कीर्ती सुरेशचेही असे काहीतरी सारखे होईल का? ती नकळत कदाचित एखादा नियम तोडेल का? कोट्यावधी ऑफर्स मिळाल्यानंतरही, ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये काम करत असूनही किसिंग सीन करण्यास तयार होत नाही; मुळातच कीर्ती सुसंस्कृत परिसरात वाढली आणि तिला सामान्य जीवन जगण्यास जास्त आवडते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.