मित्रांनो!, हे खरे आहे. मुंबईतील एक १० बाय १० च्या सर्वसामान्य घरातील मुलाचा आज आहे चक्क ते २५ कोटींचा आलिशान फ्लॅट, फिल्म इंडस्ट्रीतील एक सर्वसाधारण स्टंटमॅनचा मुलगा आजच्या घडीला आहे एक बेस्ट ऍक्टर नॅशनल अवॉर्ड विजेता… बॉलिवूडचा सुपरस्टार…
बॉलिवूड म्हणजेच ग्लॅमर आणि फॅशनची चंदेरी दुनिया प्रत्येक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी आपल्या आयुष्यात एकदा तरी, ह्या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवून मोठा कलाकार बनून प्रसिद्धीच्या शिखरावर जाण्याचे स्वप्न बघतातच. बॉलिवूड च्या ग्लॅमर आणि चंदेरी दुनियेने, अक्षरशः काहींना वेड लावलेले आपण पहिले आहे.
आपल्या वेडासाठी ते आपले सर्वस्व पणाला लावतात आणि मग यशस्वी देखील होतात.. अश्या अनेक प्रेरक कथा आपण बॉलीवूड मध्ये पहिल्या आहेत. ह्या क्षेत्रातील काही ज्युनियर स्टाफ ला मात्र हवे तसे श्रेय आणि प्रसिद्धी मिळत नाही. मग आपल्या मुलांना ते या क्षेत्रापासून दूर ठेवण्याचा विचार करतात.
आपल्या मुलांमध्ये टॅलेंट आणि त्यांची इच्छा असताना देखील ते आपल्या मुलांना बॉलिवूड पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र म्हणतात ना, जे ज्याच्या नाहीत आहे ते त्याला मिळणारच… अगदी तसेच काही घडले उरी ह्या प्रसिद्ध सिनेमाच्या मुख्य कलाकार म्हणजेच विकी कौशल सोबत…
आज विकी कौशल फक्त ३३ वर्षांचा आहे, आणि इतक्या कमी वयात राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या काही नावांपैकी एक त्याचे नाव आहे. ‘उरी द सर्जकिल स्ट्राईक ‘ ह्या चित्रपटाने त्याला रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विकीला प्रचंड संघर्ष करावा लागला.
आपल्या वडिलांचा प्रखर विरोध पत्करुन तो बॉलिवूडमध्ये आला. अन् आज तो एक लोकप्रिय अभिनेता म्हणून सर्वत्र ओळखला जातो. मुंबईतील एक मध्यमवर्गीय कुटुंबात विकीचा जन्म झाला होता. बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन आणि दिग्दर्शक म्हणून त्याचे वडील श्याम कौशल काम करत होते. सिनेसृष्टीत आपला जम बसवण्याकरिता त्यांनी त्याकाळी प्रचंड संघर्ष केला होता.
हा संघर्ष आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ शकतो हे सहाजिकच त्यांना वाटत होते, शिवाय यश मिळण्याची देखील काहीही खात्री नाही. आणि म्हणून ते वारंवार विकीच्या अभिनय करण्याच्या आवडीला प्रखर विरोध करत होते. कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन विकीनं इंजिनियरिंग तर केलं. मात्र, या क्षेत्रात त्याचं मन अजिबात रमत नव्हतं.
प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय करुन आपली आवड पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असे. कॉलेजमध्ये असल्यापासून तो विविध इंग्रजी व हिंदी नाटकांमध्ये देखील काम करत होता. अखेर एकेदिवशी त्यानं निर्धार केला आणि इंजिनिअरिंग सोडलं, कोणालाच न सांगता अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्याला एक उत्तम दिग्दर्शक व्हायचं होतं.
म्हणून अनुराग कश्यप ह्यांच्याकडे तो इंटर्नशिप करत होता. गँग्स ऑफ वासेपूरची निर्मिती सुरु असताना तो ह्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. मात्र त्याच्याकडे अभिनयाचेच सर्व गुण आहे आणि त्यानं अभिनयच करायाला हवा असा सल्ला त्याला सतत त्याचे मित्रमंडळी आणि खास म्हणजे अनुराग कश्यप ह्यांनी देखील दिला.
म्हणून त्याने काही ठिकणी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. ‘मसान’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला तिकिटबारीवर फारसं काय यश मिळालं नाही, मात्र समिक्षकांनी विकीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं. त्यानंतर मग ‘रामन राघव’, ‘संजू’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ अश्या अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला.‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळं तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आणि प्रचंड लोकप्रिय झाला. ह्याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.