मित्रांनो!, भाऊ कदम… काय? आलं ना हसायला? मग?… अहो!, भाऊ कदम हे नावच असं आहे की, नुसतं उच्चारलं तरी उभ्या महाराष्ट्राला हसायला येतं. आपल्या भोळ्या-भाबड्या (वाटणाऱ्या) चेहऱ्यावर विनोदाचे अचूक टायमिंग ठेऊन भाऊ जे काही हावभाव साकारतो आणि त्यातून रसिक प्रेक्षकांचा जो काही हास्यकल्लोळ होतो.

सांगण्याची नव्हे तर खास अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि भाऊच्या याच अफलातून विनोदाने क्लास पासून तर मास पर्यंत सर्वत्र भाऊंचे चाहते पसरलेले आहेत. आज भाऊ कदम स्टेजवर आला की लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडतात. प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येकाला आज भाऊ कदम आपला माणूस वाटतो.

आपल्या विनोदबुद्धीनं आणि अचूक टायमिंगनं अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा भाऊ कदम Bhau Kadam आज चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. महाराष्ट्रात भाऊ कदम हे नाव माहित नाही, असा माणूस विरळाच. त्याचे असंख्य फॅन आहेत. अगदी भाऊ महाराष्ट्राच्या कानाकोप-यात गेला तरी, फॅन त्याला भेटतात.

आपल्या लाडक्या भाऊच्या एका अनोख्या फॅनची ही अफलातून गोष्ट. खेड शिवापूरच्या एका पेट्रोलपंपावर भाऊला भेटलेला हा फॅन म्हणजे भाऊवरील प्रेमाचा एक चालता बोलता नमुनाच जणू…खेड शिवापूरच्या एका पेट्रोलपंपावर भाऊला भेटलेला हा फॅन म्हणजे नाद खुळा.

होय, अगदी तो भाऊच्या प्रेमात आणि त्याला भेटल्यावर भाऊ त्याच्या प्रेमात. आपल्या या फॅनसोबतचा एक फोटो भाऊनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय तो त्याचा किती मोठा चाहता आहे, हेही सांगितलं आहे. Chala Hawa Yeu Dya fame Bhau Kadam.

इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलेल्या या पोस्टवर भाऊ म्हणतोय की, “आज कामासाठी बाहेर गेलो असता, रस्त्यात खेड शिवापूरच्या एक पेट्रोल पंपावर एक फॅन भेटला… आणि त्याच प्रेम पाहून त्याच्यासोबत एक फोटो काढण्याचा मोह मला काही आवरला नाही…त्याने चक्क त्याच्या हातावर माझं नाव गोंदवलेलं… रंगभूमीमुळे मिळालेलं हे प्रेम मला असचं चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहिल…धन्यवाद मित्रा!,”

भाऊबद्दल सांगायचं झालं तर, भाऊनं रंगभूमीवरून  अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. ‘जाऊ तिथे खाऊ’ हे त्याचं नाटक त्या काळात चांगलंच गाजलं होतं.  या नाटकानं भाऊच्या करियरला एक दिशा दिली. सुरुवातीला नाटकात काम करताना भाऊला १०० रुपये मिळायचे. नंतर १५०, २५०, ३५०, ७५० एवढं मानधन मिळायला लागलं. त्यातून घर संसाराचा गाडा कसाबसा चालायचा.

आज त्याच भाऊ कदम  एका एपिसोडसाठी ऐंशी हजार रुपये घेतात, असे कळते. आज भाऊ कदम स्टेजवर आला की लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडतात. प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येकाला आज भाऊ कदम आपला माणूस वाटतो. भाऊंनी नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये आणि पाचशेहून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केलं आहे.

महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर भाऊ कदम यांना टीम स्टार मराठी कडून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!