बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत शाहरूख खान म्हटलं की, त्याची एक वेगळीच चमक, त्याच्या चाहत्यांची क्रेझ, त्याच्या अनेकदा सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत होणारा त्याचा समावेश या साऱ्या गोष्टी आपोआप आल्याच. बॉलीवुडमधे एकप्रकारचं सर्वाधिक गाजलेलं आणि लोकप्रिय असलेलं कपल म्हटलं तर त्यातही शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी यांचा समावेश होतोच.
आजवर सर्वांनाच बऱ्यापैकी शाहरूख आणि गौरी या दोघांची प्रेमकहाणी चांगलीच परिचयाची झालेली आहे. शाहरुख आणि गौरी या दोघांच 1991 या सालात लग्न पार पडलं. आज नाही म्हटलं तरी ही जोडी अगदी भन्नाट आणि लग्झरीयस आयुष्य जगत असलेली पहायला मिळते. शाहरुख खान हा बॉलिवुडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक गणला जातो. तर त्याच पद्धतीने दुसरीकडे त्याची पत्नी गौरी हिदेखील एक इंटेरियर डिझाईनर या कामात अगदी रूजलेली व तरबेज असलेली पहायला मिळते.
भारतातल्या काही नामांकित इंटेरियर डिझाईनर्सपैकी तिच्याही नावाचा समावेश त्यात होतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु गौरीने आजवर मुकेश अंबानी, रॉबर्टो कावल्ली व रॉल्फ लॉरेन यांच्यासारख्या दिग्गज लोकांच्या घरांचे इंटेरियर डिझाईन स्वत: केलेले आहे. शाहरुख खान याचं म्हटलं जाणारं रेड चिलीज हे प्रोडक्शन हाउसदेखील खऱ्या अर्थानं गौरीच्याच मालकी हक्काचं असल्याच पहायला मिळतं.
गौरीकडेच याचे अधिकार आहेत. मुळात गौरीचा 2018 सालात 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत समावेश झाला होता. मुळात आज सर्वाधिक श्रीमंत कोण? गौरी की शाहरूख खान हा प्रश्न याकरता पडतो कारण गौरी आपल्या स्वत:च्या माध्यमातून काम करणं अथवा पैशे कमावण्याच्या बाबतीत कुठेही मागे पडलेली नाहीये. एकप्रकारे एक महिला घर, कुटुंब सांभाळूनदेखील इतर गोष्टीत पुढाकार घेऊन हिरारीने काम करू शकते हे ती अगदी उत्तमरित्या दाखवून देत आहे.
शाहरुख खान आणि गौरी मधली सर्वाधिक श्रीमंत कोण याची शर्यत कदाचित शाहरुख खान जिंकला आहे असचं म्हणावं लागेल. परंतु गौरीदेखील त्याच्या पाठोपाठ त्याचा पाठलाग करत थोडक्याच कालावधीत त्याच्यापेक्षा अधीक श्रीमंत होऊ शकते, यात काहीच शंका नाही. कोईमोई या संस्थेने जाहिर केलेल्या वृत्तानुसार आजच्या घडीला शाहरूख खान याची एकूण संपत्ती 5100 कोटी इतकी असून दुसरीकडे गौरीची एकूण संपत्ती 1600 कोटींच्या घरात आहे. शाहरुख खान याचं मुंबईत असलेलं मन्नत हे घर तब्बल 26,328 स्क्वेअर फुट इतकं आहे. तर दुसरीकडे दुबईला त्याचा आलीशान व्हिलादेखील असलेला पहायला मिळतो. शाहरुखच्या मन्नत या घराची किंमत सरासरी 200 कोटींच्या घरात असल्याची माहितीही अनेकदा प्रसारमाध्यमांमधे चर्चेत राहिली आहे. दुसरीकडे दुबईतल्या त्याच्या व्हिलाची किंमत ही 24 कोटींच्या घरात आहे.
या सगळ्या गोष्टींशिवाय बॉलीवुडच्या किंग खानचं लंडन येथेदेखील एक स्वत:च घर आहे, ज्याची किंमत 172 कोटींच्या आसपास आहे. या गोष्टींवरून अंदाजा येईलचं शाहरूख हा लग्झरी आयुष्य जगण्याबाबत किती उत्साही असतो. अर्थातचं एका मिडल क्लास कुटुंबातून मेहनत करून वर येऊन आज त्याने जे कमावलं आहे, ते निश्चितच अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय आहे असं म्हणावं लागेल.
शाहरुख खान मिर फाऊंडेशन चालवून ॲसिड व्हिक्टिम ठरलेल्या महिलांची अनेकदा मदत करत असतो. शाहरुखच्या कोलकाता नाइट रायडर्स सारख्या आणखी इतर तीन क्रिकेट क्लब टिमदेखील मालकीच्या हक्काच्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स ही त्याची आणि जुही चावला या दोघांची मिळून एकत्रीत मालकी हक्काची टिम आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!