तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क तब्बल 8 वर्षांनंतर कोण मराठी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करत आहे? हा अभिनेता इतर कोणी नसून ज्याला तुम्ही चांगलच ओळखत असालं असा “भुषण प्रधान” हा आहे. भुषणला तुम्ही टाईमपास या प्रचंड गाजलेल्या सिनेमातील प्राजुचा भाऊ म्हणून पाहिलं आहे. आता हा अभिनेता अनेक दिवसांनंतर तुमच्यासमोर एका खास भुमिकेतून येणार आहे.

त्याच्या नव्या भुमिकेची स्टार प्रवाह या वाहिणीने अगदी चाहूलदेखील नुकतीच एका कार्यक्रमातील सोहळ्यादरम्यान देऊन टाकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यवर आधारित आजवर विविध मालिका, सिनेमे आपण पाहिले अनुभवले. तर आता नुकतचं स्टार प्रवाह या वाहिणीने पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवणावर मालिकेचं चित्रीकरण करायचं ठरवलं आहे.

विशेष बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाह याच वाहिणीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित एक मालिका रसिकप्रेक्षकांच्या भेटीस आणली होती ज्यात प्रमुख भुमिका अमोल कोल्हे या अभिनेत्याने साकारली होती. ही मालिका त्या काळात प्रत्येकाच्या प्रचंड पसंतीस उतरल्याची पहायला मिळाली होती. या मालिकेने अनेक विविध प्रकारचे रेकॉर्ड्सदेखील तोडले होते.

आणि आता पुन्हा स्टार प्रवाह ही वाहिनी नव्या जोमाने, नव्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यवर मालिका घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत भुषण प्रधान हा अभिनेता आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भुमिकेत पहायला मिळणार आहे. या बातमीने अनेकांना आनंदाचा ध’क्का बसला आहे. भुषण प्रधान कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

भुषण प्रधान त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर प्रचंड सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो नेहमीच त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यावर्गाची अजिबातच कमी नाहीये. अनेक दिवसांपासून त्याचे चाहते त्याच्या एखाद्या भन्नाट नव्या प्रोजेक्टची वाट पाहत होते आणि शेवटी एकदाचा आता भुषण टेलीव्हिजनवर झळकणार ही बातमी चाहत्यांसाठी प्रचंड सुखदायी ठरली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात भुषण याने छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला, त्यावर अनेकांच्या त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्याने त्याच्या या आता नव्या सुरू होणाऱ्या इनिंगबाबत सोशल मीडियावर माहिती देताना म्हटलं आहे की, मी तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने काम करण्यास सज्ज होतो आहे. आणि या कामाकरता मी खुपच उत्सुक आहे असंही तो म्हणाला.

नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नव्या मालिकेच्या नावासहित एक फोटोही शेअर केल्याचा पहायला मिळाला आहे. “जय भवानी, जय शिवाजी” असं या मालिकेचं नाव असणार असल्याचं त्यावरून समजलं आहे. “मिसमॅच”, “टाईमपास”, “सतरंगी रे”, “कॉफी आणि बरचं काही” अशा नानाविध सिनेमांमधून त्याने आजवर अनेक भुमिका साकारल्या आहेत. भुषण एकप्रकारे सदाबहार अभिनेता आहे असं म्हणता येइल. भुषण त्याच्या भुमिका ज्या सहजतेने साकारतो ते फारच मनाला प्रत्येकाला भावून जातं यात काहीच शंका नाही. भुषण आता कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेला नव्या मालिकेच्या माध्यमातून न्यात देतो हे पाहणं नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!