आपल्या सर्वांना आजवर एक गोष्ट माहितचं आहे ते म्हणजे रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच गाजलेलं प्रेमप्रकरण. त्या काळात दोघांच्या मनावर एकमेकांची धुंदी प्रचंड प्रमाणात चढली होती. दोघे एकमेकांसोबत लग्नदेखील करणार होते. परंतु वारंवार रणबीरच्या आईने कॅटरिना कैफला आपल्या घराची सुन म्हणून स्विकारण्यास नकार दिल्याने रणबीर आणि कॅटरिनाला वेगळं होण्यावाचून पर्याय शिल्लक उरला नाही.

त्या काळात दोघांची जवळीक इतकी वाढली होती की तब्बल 6-7 वर्ष दोघांनी एकत्रित लिव्ह-इन मधे घालवली होती. सुरुवातील कॅटरिना कैफ हिंदी सिनेसृष्टीत नव्याने आली असताना तिचे चांगलेच सिनेमे येऊ लागले होते अशातच सलमान – कॅटरिना या जोडीच्या प्रेमात असल्याच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांमधे पसरल्या होत्या.

परंतु त्याचदरम्यान अनेकांना खबर नव्हती आणि इकडे कॅटरिना चक्क रणबीर कपूर याच्या प्रेमात पडली होती. रणबीर कपूर हादेखील तिच्या प्रेमात चांगलाच मुग्ध झालेला पहायला मिळाला होता. सध्याच्या घडीला विशेष बाब म्हणालं तर कॅटरिना रणबीरपासून वेगळी झाल्यानंतर आजही एकटीच राहत आहे.

तिचा कदाचित पुन्हा एखाद्या नात्यावर विश्वास बसणं कठीण आहे. दुसरीकडे रणबीर कपूर त्याच्या आयुष्यात मुव्ह ऑन झालेला पहायला मिळतो आहे. आज त्याच्या आयुष्यात आलिया भट ही अभिनेत्री आहे. आणि आलिया व रणबीर हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही गोष्टी हल्ली समोर आल्या आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की, रणबीर कॅटरिनाच्या प्रेमात अक्षरश: ठार वेडा झाला होता.

एक काळ असा होता की, कॅटरिना कैफ हिच्याकरता रणबीर वाटेल ती गोष्ट करायला अगदी हिरारीने तत्पर असायचा. मुळात आज वेगळं झाल्यानंतरही कॅटरिना आणि रणबीर यांची मैत्री चांगली टिकून आहे, ही बाब विशेषचं म्हणावी लागेल. कॅटरिनावर जिवापाड प्रेम करत असलेल्या रणबीरने त्या काळी कॅटरिनाला आपल्या घरात एन्ट्री मिळाली याकरता अनेक गोष्टी केल्या होत्या, त्याने हर एक प्रकारे आपल्या आईला तिच्याकरता समजूत घालण्याचादेखील बेत अनेकदा रचला होता.

परंतु शेवटी दोघांना वेगळं व्हावंच लागलं. एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूर म्हणाला होता की, कॅटरिनासाठी तो जिव द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. तो तिच्याकरता जिव देऊ शकतो. रणबीर पुढे हेदेखील म्हटला की, तो काही ठराविक लोकांशीच कनेक्ट होऊ शकतो किंवा त्याच ठराविक लोकांसोबत तो अधिक चांगला कनेक्ट होऊन राहू शकतो.

त्याने त्याच्या निवडक लोकांच्या यादीत कॅटरिना, त्याच कुटुंब, इम्तियाज अली, रोहीत धवन, अनुराग बासू यांचा समावेश केलेला पहायला मिळतो. सर्वांना एक बाब निश्चितच माहित आहे की, रणबीर दिपिका आधी रिलेशनशीपमधे होते परंतु कॅटरिनाच्या आयुष्यात येण्याने रणबीर कॅटरिनावर आपोआपच भा’ळ’ला.

मग रणबीर आणि दिपीका यांच ब्रेक-अप कॅटरिना कैफच्या विषयावरून झालं. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री फारच भन्नाट आणि रसिकप्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारी ठरली आहे. “अजब प्रेम की गजब कहानी” हा या दोघांचा एकत्रीत सिनेमा आजही लोकांच्या मनातून हटत नाही. शिवाय राजनिती आणि जग्गा जासूस या सिनेमांमधेही दोघांनी एकत्रित काम केल्याचं पहायला मिळालं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!