कचऱ्याच्या ढिगावर सापडली मुलगी, भाजी विक्रेत्याने केला सांभाळ, 25 वर्षांनी उजळले नशीब! आसाम – आयुष्यात केव्हा काय होईल, याची कुणालाच कल्पना नाही. नशीब क्षणातच माणसाला यशोशिखरावर नेऊ नेऊ शकते. नेहमी एकमेकांना मदत केली पाहिजे, हे हे सर्वच शिकतात. परंतु आचरणतात काहीजणच आणतात. ते ते म्हणतात ना- चांगल्या कर्माचे नेहमी चांगले फळ मिळते.
आज आम्ही तुम्हाला एक अशीच कहाणी सांगत आहोत, जी ऐकून तुम्ही भावुक झाले नाही तर नवल.ही प्रेरणादायी कहाणी आहे, आसामच्या तिनसुकियामध्ये गल्लोगल्ली जाऊन हातगाडीवर भाजी विकणाऱ्या सोबरनची. सोबरन रोजच्या प्रमाणे एका दिवशी भाजी विकण्यासाठी निघाला. वाटेत त्याला रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक बाळ रडत असताना दिसले.
त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या कचऱ्यातच्या ढिगाऱ्यावर एक नवजात मुलगी होती. ही गोष्ट 25 वर्षे जुनी आहे. सोबरन त्या बाळाला घेऊन घरी आला. त्याचे तेव्ह लग्न झालेले नव्हते. परंतु तान्हुल्या बाळावर त्याचा जीव जडला आणि त्याने तिचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.
त्याने या मुलीचे नाव ज्योती असे ठेवले. सोबरनने या मुलीला स्वत:चे नाव देऊन शिकून-सवरून मोठे केले. मुलीला कशाचीच कमतरता भासू नये म्हणून सोबरनने खूप मेहनत घेतली. वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून तिला घास भरवला. तिच्या शिक्षणासाठी दिवसरात्र एक केला. आणि त्याच्या मेहनतीलाही फळ आले, कारण मुलगी अभ्यासात प्रचंड हुशार निघाली.
कॉम्प्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर ज्योतीने सन 2014 मध्ये आसामच्या लोकसेवा आयोगची पीसीएस परीक्षा दिली. ज्योतीने सर्वांना थक्क करत या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
यानंतर ज्योतीला थेट आसाम आयकर विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे. सोबरनच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता तो त्याची कन्या ज्योतीसोबत सरकारी बंगल्यावर राहतो.सोबरनला जेव्हा विचारण्यात आले की, आज आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या पदावर पाहून तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो फक्त एवढेच म्हणाला की, त्यांच्या मुलीने त्यांच्या 25 वर्षांच्या कठोर परिश्रमाचे चीज केले आहे.
सोबरनची ही कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. जी नक्कीच सर्वांना प्रेरणादायी आणि भावुक वाटत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.