रस्त्यावरील चायनीज गाड्यांवरील अन्नपदार्थ जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. शिवडी परिसरात आज अन्न आणि औषध प्रसाधानाने चायनीज हातगाड्यांवर धाडी टाकल्यात.

तिकडच्या एका अनधिकृत वस्तीत २५ किलो खराब झालेले चिकन सापडल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे. हे खराब झालेले चिकन या चायनीज गाड्यांवर 30 रुपये किलोने विकले जात होते.

जप्त केलेले हे चिकन कुजलेले होते. यासंदर्भात एका व्यक्तीस गजाआड करण्यात आले असून त्याविरोधात आर ए किडवई नगर पोलिस स्टेशनमध्ये खटला दाखल केला गेला आहे.रस्त्यावरील चायनीजच्या गाड्यांवर बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये हे चिकन वापरले जात होते.

हे चिकन कुजलेले असून खराब आणि निकृष्ट कोंबड्यांचे होते. त्याशिवाय हल्लीच शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरात गाडीवरील चायनीज पदार्थ खाल्ल्यामुळे ३० जणांना विषबाधा झाल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले होते.

जर तुम्हीही रस्त्यावरील हातगाडीवर असे पदार्थ खात असाल नक्की काळजी घ्या.असे उघड्यावरील पदार्थ खाणे धोकादायक ठरू शकते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.