Kalla Logo

Kalla Logo

तरूणाईचे स्पंदन अचूक टिपलेल्या झी युवाच्या वतीने मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी कोल्हापुरात “कल्ला”या कार्यक्रमासाठी येणार आहेत. कोल्हापूरकरांना मनोरंजनाची धमाल पर्वणी पाहायला मिळणार आहे  . झी युवाच्या “कल्ला ” या कार्यक्रमात मंगळवारी  ‘ही पोरीसाजूक तुपातली’च्या ठेक्यावर थिरकायला लावणारी शिबानी दांडेकर, श्रावणबाळ रॉकस्टार मालिकेत ‘कामिनी’ साकारणारी केतकी पालव, मराठी इंडस्ट्रीतला नवारफटफ हिरो गश्मीर महाजन, ऑनलाइन बिनलाइन सिनेमातून पदार्पणातच पसंतीची पावती मिळवणारी ऋतुजा शिंदे, टीनएजर्सच्या इमोशन्स कॅच करणाराप्रथमेश परब आणि डान्सक्वीन मानसी नाईक यांचा कोल्हापुरात सेलिब्रिटी कल्ला होणार आहे. सहा वाजता शाहू खासबाग मैदान येथे ही जल्लोषी सायंकाळथिरकरणार आहे. लालमातीतल्या कुस्त्यांचे डाव रंगणाऱ्या शाहू खासबाग मैदानात दोन दिवस भीमा फेस्टिवल रंगणार आहे. या महोत्सवाची सांगता झी युवाच्याकलाकारांच्या डान्स आणि धमाल परफॉर्मन्स च्या कल्ल्याने होणार आहे.

सध्या तरूणाईला वेड लावलेल्या झी युवा या वाहिनीने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.नव्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाला चढणारी नशा अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरही आतूर झाले आहेत. टाइमपास सिनेमातील ही पोरी साजूकतुपातली…तिला म्हवऱ्याचा लागलाय नाद या गाण्याने तरूणाईवर गारूड केले आहे. लग्नाच्या वरातीपासून कॉलेजच्या गॅदरिंगपर्यंत या गाण्याने मोहिनी घातलीआहे. या गाण्याला ठसकेबाज आवाज देणाऱ्या शिबानी दांडेकरचा डान्स या कल्ला च्या मंचावर होणार आहे. सिक्सपॅक्स अॅब्ज आणि तितकाच गोड चेहरा असलेल्यागश्मीरवर सध्या तरूणी फिदा आहेत. कोल्हापुरातच चित्रीकरण झालेल्या कॅरी ऑफ मराठा सिनेमापासून अल्पावधीतच अभिनयक्षेत्रात स्थान पटकावणाऱ्यागश्मीरचे डान्सकौशल्यही अफलातून आहे. गश्मीर कोल्हापूरकरांना ठेका धरायला लावणार आहे. सोबत स्टँडअप कॉमेडीत हसवणूक करणारी प्राजक्ता हणमगर आणिअतुल तोडणकर ही जोडी आणि लव्ह लग्न लोचाची काव्या, चॉकलेट हिरो सिद्धार्थ चांदेकर याचा नाचो सेशन्सही असणार आहे. हा कार्यक्रम लवकरच झी युवावरदाखवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here