प्रेम प्रकरण आणि एकत्र येऊन आयुष्यात केलेली वैवाहिक सुरुवात. अशी बरीच प्रकरणं आपल्याला दिसून येतील. मराठी आणि बॉलिवूड मध्ये तर खूप प्रकरणं अशी आहेत की काहींनी प्रेम केलं आणि त्यानंतर नव्या आयुष्याची सुरुवात केली. एक मराठी मधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिला हिंदी मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे.

ती अभिनेत्री एका जेष्ठ अभिनेत्री ची मुलगी आहे आणि तसेच नॅशनल सकूल ऑफ drama मधून पास आउट आहे. त्या अभिनेत्री ने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि सांगितले की तिच्या प्रियकर ने नवरा म्हणून इतक्या वर्षी होकार दिला होता. तिची पोस्ट खूप व्हायरल होत आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

मराठीसोबतच हिदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष वयाच्या 17 व्या वर्षी प्रेमात पडली होती. होय, कोणाच्या तर संदेश कुलकर्णीच्या. हा संदेश कोण तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ.

त्या दिवशी अमृता सोनालीच्या वाढदिवसाला तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेली होती. पण सोनाली आधी अमृताला भेटला तो सोनालीचा भाऊ संदेश. त्याने कुर्ता घातला होता आणि हाताच्या बाह्या दुमडल्या होता. संदेशला पाहिले आणि हाच माझा नवरा…, असा एक आवाज अमृताला आतून ऐकू आला. पुढे दोघांत मैत्री झाली.

मात्र प्रेमकहाणी कशी सुरु झाली तर अमृताच्या पुढाकाराने. होय, अमृताने पुढाकार घेत, संदेशला प्रपोज केले. 26 वर्षांपूर्वी म्हणजे 3 जानेवारीच्याच दिवशी संदेशने या नात्याला होकार दिला होता.

होय, अमृताने या सुंदर क्षणाच्या आठवणी जाग्या करत, एक पोस्ट शेअर केली आहे. काही फोटो आणि यासोबतचा एक व्हिडीओ अमृताने शेअर केला आहे. ‘26 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्याने मला होकार दिला आणि ….’ असे लिहित तिने तिने रिलेशनशीप अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करतानाचे सुंदर क्षण शेअर केले आहेत.

https://celebsradar.com/wp-content/uploads/2019/07/sonali-kulkarni-age.jpg

व्हिडीओत अमृता व संदेश एका कॅफेत एक लाईव्ह प्रोग्राम एन्जॉय करताना दिसत आहे. दोघेही अतिशय आनंदात आहेत. फोटोतीलही त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.

अमृताचा पती संदेश कुलकर्णी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताने ब-याच वेळा एकत्र काम केले आहे. अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. अमृताचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम केले.

तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. 2012 साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

अमृता आणि संदेश हे खूप ग्रेट अशी माणसं आहेत. दोघेही सुखी संसारात रमलेली आहेत. त्यात अमृता चं काम तर खूप भारी चाललेलं आहे. नवाज उद्दीन सोबत तर तिचं काम बोलकं आहे. सध्या हिंदी मध्ये एक नावाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या अभिनेत्री मध्ये अमृता सुभाष चं नाव घेतलं जातं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.