ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

ग्लॅमर्स गोष्टी म्हंटल्या की चर्चा आल्या आणि एशो आरामात आयुष्य जगणं ही आलंच. काय होतं की एखादा कलाकार जेव्हा लोकांच्या नजरेत सुपरस्टार होतो आणि त्याची बायको किंवा घरात काहीही घडलं तरी ते चर्चेत येत असतात.

सध्या मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत असेच अनेक कपल्स आहेत. ज्यांनी प्रेम करून वैवाहिक जीवनाची सुरुवात केलेली आहे. त्यात कॉमन म्हणजे मराठी त ही आणि हिंदि मध्येही आघाडीवर असणारे कपल्स म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख.

होय, सध्या जेनेलिया चा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात तिने नेमकं काय केलं हेच आपल्याला जाणून घेण्यासाठी आम्ही खाली सविस्तर लेख बनवत आहोत. चला मग जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. रितेश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत त्याचे आणि जेनेलियाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. मात्र, आता जेनेलियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तेरा बन जाऊंगा’ हे गाण सुरू आहे.

हा व्हिडीओ शेअर करत ‘फॉरेवर वाला लव्ह’ अशा आशयाच कॅप्शन जेनेलियाने दिलं आहे. हा व्हिडीओ ३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘खऱ्या प्रेमाचे उदाहरण द्याचे असेल तर हेच आहे’. दुसरा नेटकरी म्हणाला ‘क्युटेस्ट कपल’. तर अभिनेता करणवीर बोराहनेही कमेंट करत ‘क्युटेनेस’ असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला असून सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. एकतर त्यांच्यातल प्रेम हे लग्ना आधीही खूप चर्चेत होतं. आणि अजूनही आहेच. त्यांचं प्रेम असेच बहरत जाओ आणि चाहत्यांना आनंदाच्या गोष्टी कानावर पडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.