झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय .अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम झी युवावर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता पहायला मिळतो. या कार्यक्रमाचे जज लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य हे आहेत . अद्वैत दादरकर हा कार्यक्रमाचा होस्ट असून गंगा आणि अभिनेत्री गायत्री दातार हा शो को होस्ट करत आहेत . या कार्यक्रमात ओंकार शिंदे हा नृत्य दिग्दर्शक असून तो स्पर्धकांसाठी मेंटॉर सुद्धा आहे .या कार्यक्रमात सुरवातीला १४ सेलिब्रिटी डान्सर स्पर्धक होत्या मात्र स्पर्धेच्या स्वरूपातील या कार्यक्रमात आता त्यातील केवळ ९ डान्सर स्पर्धक राहिल्या आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये सध्या जयडी म्हणजेच पूर्वा शिंदे च्या परफॉर्मन्स ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे . त्याला कारणही तसेच आहे . अनेकवेळा डेंजर झोन मध्ये जाऊन आल्यावर सध्या पूर्वा तिच्या प्रत्येक परफॉर्मन्स वर गोल्डन बझर घेत आहे.पूर्वा शिंदे ही अभिनेत्री आपल्याला लागीर झालं जी या मालिकेत जयडी च्या भूमिकेत पहायला मिळाली होती. तिचे लूक्स , तिचा अभिनय या सर्वांचा एक चाहता वर्ग आहे . मात्र युवा डान्सिंग क्वीन मध्ये तीच्या जयडी या पात्राच्या पूर्णपणे उलट आणि पूर्णपणे हटके अशा हॉट अवतारात तिने एंट्री केली . प्रेक्षकांना या रूपात तिला बघायची सवय नव्हती पण हळू हळू तिचे हे रूप सुद्धा प्रेक्षकांना आवडू लागले . सुरवातीला तिला केवळ बॉलीवूड स्टाईल येत असल्यामुळे ते परफॉर्मन्स खूप चांगले व्हायचे मात्र इतर प्रकारात मात्र तिला प्रॉब्लेम होत होता . मात्र मेहनती पूर्वा ने हळू हळू ओंकार शिंदेकडून नृत्याच्या सर्व प्रकारांचे धडे घेत आता ती सर्व फॉर्म मध्ये तरबेज झाली आहे. सध्या तीच्या प्रत्येक परफॉर्मन्स ला जजेस गोल्डन बझर देत आहेत . हळू हळू आणि शिकत शिकत आज पूर्वा युवा डान्सिंग क्वीन च्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. आजवर तिने हे मराठी पोवाडा , बॉलीवूड लावणी , कॉन्टेम्पररी , भारूड असे नृत्याचे अनेक प्रकार तिने केले आहेत आणि त्यावर जजेस चा ब्लास्ट सुद्धा मिळवला आहे आणि सध्या ती प्रेक्षकांच्या आवडत्या युवा डान्सिंग क्वीन पैकी एक आहे.
या बद्दल पूर्वा शिंदे हिला विचारले असता ती म्हणाली ” मी जेव्हा युवा डान्सिंग क्वीन मध्ये आली तेव्हा खरंतर डान्स आणि माझं असं काही ग्रेट नातं नव्हतं , मात्र हळूहळू इतरांचे परफॉर्मन्स पाहताना मला वाटायचे ह्यांना जमतं तर मला का नाही ? या विचाराने प्रेरित होऊन मी जास्त वेळ सरावामध्ये घालवायला लागले. ओमकार च्या मागे लागून लागून नवनवीन प्रकार आत्मसात करायला लागले . जसजसा सराव वाढत गेला तसा माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यामुळेच माझे परफॉर्मन्स आणखी खुलू लागले . मी जिंकीन किंवा नाही या बद्दल मी नाही भाष्य करणार कारण जिंकायचं प्रत्येकाला असतं पण झी युवावरील युवा डान्सिंग क्वीन मुळे मला शिकायला भरपूर मिळालं हे मात्र नक्की . ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही डान्सची स्पर्धा असली, तरी अशा अनेक रंगतदार गोष्टी मंचावर घडत असतात. तरुणींच्या दिलखेचक अदाकारीने परिपूर्ण असे नृत्याविष्कार अनुभवण्यासाठी, पाहायला विसरू नका, ‘युवा डान्सिंग क्वीन’, बुधवार ते शुक्रवार, रोज रात्री ९:३० वाजता फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर!!!